मराठी पुस्तक-प्रेमी (Marathi Book Lovers) discussion

17 views
पुस्तकचर्चा | Book talk > दर्जेदार दिवाळी अंक - कवी आणि लेखकांना आवाहन

Comments Showing 1-1 of 1 (1 new)    post a comment »
dateUp arrow    newest »

message 1: by Aapla (new)

Aapla Namr | 2 comments दिवाळी आली कि दिवाळी अंक आलेच. दिवाळी अंक हे एक पुस्तक राहिले नसून एक संस्कृती, एक परंपरा बनली आहे. ह्याच परंपरेला पुढे नेण्यासाठी येतोय "दर्जेदार" चा दिवाळी अंक. समाज घडवण्याचे काम साहित्य चांगल्याप्रकारे करू शकते हा प्रत्येकाचा पूर्वानुभव आहे. चांगले विचार शुद्ध आचरणासाठी प्रेरणादायी ठरतात. दर्जेदार साहित्यकृती संग्रहित ठेवण्यायोग्य व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. प्रथितयश, नवोदित साहित्यिकांनी कविता, कथा, ललित अशा विविध साहित्य प्रकारातील साहित्य पाठवावे हि विनंती. विशेषतः कुमारवयीन मुले, पालक, शिक्षक यांच्यासाठी प्रेरणादायी साहित्य असावे हि अपेक्षा. आपले विचार, भावना समाजापर्यंत पोहचविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आपले साहित्य darjedaar@gmail.com ह्या इमेल वर दि. ३१ सप्टेंबर २०१५ पर्यंत पाठवावे.


back to top

86477

मराठी पुस्तक-प्रेमी (Marathi Book Lovers)

unread topics | mark unread