मराठीअक्षरमित्र discussion

Hotel Roadside हॉटेल रोडसाईड मराठी Horror Book
17 views
०४. पुस्तकचर्चा | Book talk > हॉटेल रोडसाईड मराठी Horror Ebook

Comments Showing 1-1 of 1 (1 new)    post a comment »
dateUp arrow    newest »

message 1: by Hemdiva (last edited Aug 06, 2019 10:55PM) (new) - rated it 5 stars

Hemdiva Dev (diva_princess) | 3 comments नमस्कार
माझे दुसरे ईबूक Amazon वर प्रकाशित झाले आहे. ही भयकथा असुन, पाच मैत्रिणीना आलेला भयानक अनुभव वाचण्याचा आनंद आपल्याला येईल.

"हॉटेल रोडसाईड", इशिता ने पाटी वाचली.
"आपण इकडे थांबणार आहोत?", ती अविश्वासाने म्हणाली...
निर्मला टॅक्सीतुन सामान काढत होती, "का? काय झाले?" "जस्ट लूक ऑट द प्लेस!", सोनियाही रागात म्हणाली.
सर्वच हॉटेल कडे पाहू लागले...
होटेल कसलं, पडका बंगला होता! जंगलाच्या मधोमध ऊभा होता. अंधारात बूडालेला. दगडी दोन मजली खुपच जूनी इमारत.
निर्मला दुर्लक्ष करत म्हणाली, "लवकर आत चला. कूठच्याही क्षणी पाऊस पडेल. काही झाले तरी ह्याच ठिकाणी थांबावं लागेल! कारण इतर सर्व जागा भरल्या गेल्या आहेत"
कोटू ही तिच्यासोबत सामान काडू लागली.
निशा मात्र गप्प उभी होती.
"यार आपण खरोखर इथे थांबणार का?", इशिता पुन्हा म्हणाली.
"दूसरा ऑपशन आहे का?", कोटू तिच्या डोळयांत डोळे घालून म्हणाली.
इशिताने दुर्लक्ष केले. अडाणी कोटू तिला कधीच आवडत नव्हती. अगदी त्या काँलेजला असल्यापासूनच त्यांचं पटत नव्हतं.
कोटू व निर्मला हॉटेलमध्ये शिरल्या व निशा ही त्यांच्यामागे गेली.
"हे सर्व ना तुझ्यामुळे झालं आहे!", इशिता रागात होती.
"माझ्यामुळे?", सोनिया ही चिडली.
"हो! तुच ही ट्रीप ठरवली आणि तूच त्या दोघींना बोलावले!", इशिता ने तिच्यावर बोट ठेवले.
सोनिया बोलणारच होती एवढ्यात तिला कसलातरी आवाज आला, म्हणून तिने आजूबाजूला पाहिले.
"काय चालले आहे तुझे? तु माझ्याकडे दुर्लक्ष करते आहेस?", इशिताचा पारा चडला.
"अग, नाही. मला कसलातरी आवाज आला... ", सोनिया सांगत होती.
"माझा आवाज येतो का तुला?", इशिता जोरात ओरडली.
"इशा!", सोनिया वैतागली.
इशिता नाक मूरडून हॉटेलमध्ये निघून गेली.
सोनियाला तिच्या बोलण्याचे फारसे वाईट वाटले नाही पण तरीही तिला रडू येत होते. कदाचीत कोटू व निर्मला खरच अशुभ होत्या, जस की सर्व बोलायचे, त्यांना ह्या ट्रीपला बोलावून तिने मोठी चूक केली होती. काँलेजला ही त्यांच्याशी कोणी बोलत नसे. पण हिलाच त्यांचा खूप पुळखा…
"सोनिया...", कोणीतरी तिला हाक मारली पण ती इतक्या हळू आवाजात की ती कूठून आली तेच कळले नाही. तशी हॅाटेल बाहेर ती एकटीच होती, आजूबाजूला जंगल होतं आणि समोर हायवेचा रोड.
ती तिची बॅग घेऊन हॅाटेलकडे वळली, हॅाटेलच्या दरवाज्यात येताच अचानक धूर आला. बघता बघता तो इतका दाट झाला की सोनियाला काही कळले नाही. तिला काही दिसत नव्हते, तरी ती पुढे चालत राहीली. तिच्या सर्व मैत्रिणी कधीच्या आत गेलेल्या, तीच मागे राहीली होती.
सोनियाचा पाय कशालातरी अडकला व ती खाली पडली, "आई गं!"
ती स्व:ताला सावरत उठली, धूर नाहीसा झाला होता आणि ती एका अंधाऱ्या खोलीत होती.
फारसे तिला दिसत नव्हते, म्हणून तिने आपला मोबाईल काडून टॅार्च ऑन केला.
सर्वात आधी तिने परिसर पाहण्याचा प्रयत्न केला, रंग गेलेल्या भिंती, धूळीत पडलेल्या लाकडाच्या वस्तु आणि ठिकठिकाणी कोळ्यांचे जाळे. मग तिने खाली टॅार्च मारली आणि घाबरुन तिच्या हातुन मोबाईलच पडला!
खाली जमीनीवर एक महिला रक्ताच्या थारोळ्यात झोपली होती! सोनियाने लगेच मोबाईल उचल्ला आणि लाईट त्या महिलेवर मारली.
त्या महिलेचे केस संपूर्ण पांढरे होते, तिची साडी सोनेरी होती. तिचा चेहरा पांढरा पडला होता व तिचे डोळे सपाट उघडे होते...
सोनिया खुप घाबरली होती, तिला काही सूचत नव्हते. तिला कोणाचा तरी चालण्याचा आवाज आला, दचकून तिने त्या आवाजाच्या दिशेने लाईट फिरवली पण तिला कोणी दिसले नाही. परत दूसऱ्या दिशेला धावण्याचा आवाज आला, लाईट मारल्यावर मात्र कोणी दिसत नव्हते.
"सोनिया...", तिच्यामागूनच तिला हाक ऐकू आली. तिने लगेच टॉर्च मागे फिरवला पण हाती काही लागले नाही. मग तिला तिच्याअगदी मागे कोणाचा तरी भास झाला. त्या व्यक्तिचा श्वास तिच्या मानेवर येत होता...
पुढे वाचण्यासाठी - https://www.amazon.in/dp/B07VQ415DR

धन्यवाद.


back to top