“निद्रा ही सर्वांत अधिक उदारहृदयी माता आहे! व्यक्तिव्यक्तींची विभिन्न दु:खं ती एकाच ममतेनं काही काल का होईना; पण निश्चितच आपल्या विशाल उदरात घेते!”
― मृत्युंजय
― मृत्युंजय
“तीन पिढ्यांचा तो अतिशय बोलका मूक संवाद फक्त शांतपणे जळण्याची ताकद असलेल्या भोवतीच्या समयांनाच कळत होता!”
― छावा
― छावा
“कर्ण, राजकारण हा तुझा विषयच नव्हे! राजकारण केवळ दंडाच्या बलावर वा मनाच्या चांगुलपणावर कधीच चालत नसतं. ते बुद्धीच्या कसरतीवर चालत असतं! माजलेलं अरण्य नष्ट करायचं झालं, तर तुझ्यासारखा साधाभोळा वीर हातात परशू घेऊन जीवनभर ते एकटाच वेड्यासारखं तोडीत बसेल! पण... पण माझ्यासारखा एका ठिणगीतच त्याची वासलात लावील!”
― मृत्युंजय
― मृत्युंजय
“अाणि अपसमज करून एखाद्याबद्दल अनादर तर कधीच बाळगू नये.”
― मृत्युंजय
― मृत्युंजय
“सत्य हे पाहणाऱ्यांच्या वा ऐकणाऱ्यांच्या इच्छेचा विचार कधीच करीत नसतं! ते नेहमीच जसं असतं तसंच पुढे येत असतं. उगवत्या सूर्यदेवासारखं!’ क”
― मृत्युंजय
― मृत्युंजय
Sunil’s 2025 Year in Books
Take a look at Sunil’s Year in Books, including some fun facts about their reading.
Polls voted on by Sunil
Lists liked by Sunil







