नदीचा काठ करुण खरा ! त्या कारुण्यात सौंदर्य असते हेही खरे. पण त्या नदीतून जर एखादा नावाडी होडी वल्हवीत पैलतीराडून ऐलतीरी येत नसला तर काही तरी अपुरे अपुरे वाटते. माणसाइतके खरोखरच पाहण्यासारखे फार थोडे आहे ! काय तऱ्हेतऱ्हेचे वागणे तहेत-हेचे बोलणे ! आणि या साऱ्या विविधतेच्या आत दडलेली एखादी ओळखीची अंतरीची खूण ! जी ह्या विविधतेलादेखील सांधून जाते.
— Mar 12, 2024 05:23AM
Add a comment