Goodreads helps you follow your favorite authors. Be the first to learn about new releases!
Start by following V.P. Kale.
Showing 1-30 of 40
“Success is a relative term. More success, more relatives.”
― का रे भुललासी [Ka Re Bhullasi]
― का रे भुललासी [Ka Re Bhullasi]
“As you write more and more personal becomes more and more universal.”
― वपुर्झा [Vapurza]
― वपुर्झा [Vapurza]
“ज्या माणसांच्या गरजा कमीत कमी असतात, ती नेहमी समाधानातच असतात.”
― पाणपोई [Panpoi]
― पाणपोई [Panpoi]
“शरीर हे एकच साम्राज्य असं आहे, आणि इतकं महाकाय आहे की त्याला एक राजधानी पुरत नाही. आवेग आणि विवेक ह्या दोन राजधान्यांचा इथे अंमल चालतो. एकमेकांचं अस्तित्व आणि महत्त्व दोघी जाणतात, एकमेकींचं एकमेंकींवर अतिक्रमणही होतं. त्या वेळी संपूर्ण साम्राज्य जिचं प्राबल्य जास्त तिच्या स्वाधीन केलं जातं. राज्याचं होणारं नुकसान नंतर दोघीही भरून काढतात. अधिकार आणि अंमल ह्यात ज्या राजधानीची सरशी होईल त्या प्रमाणात साम्राज्याचा डोलारा टिकतो किंवा कोसळतो. विवेक ह्या मुख्यमंत्र्याचे पाच सल्लागार. दूरदृष्टी, निश्चय, संयम, एकाग्रता आणि सातत्य. आवेगाचं राज्य अनेकांच्या हातात. एका राजधानीत काहीशी हुकूमशाही तर दुसरीत संपूर्ण लोकशाही. षड्रिपूंच्या मंत्रिमंडळाबरोबरच प्रलोभनं, जाहिरात, प्रसिद्धी, अपेयपान, भ्रष्टाचार ह्या सगळ्यांचं थैमान आहे. दोन्ही राजधान्यांतले मंत्री एकमेकांच्या राज्यात इथेही दौरे काढतात, शिष्टमंडळं पाठवतात, पण ते स्वतःच्या स्वार्थासाठी नसून साम्राज्य टिकावं म्हणून. इथे साम्राज्यापेक्षा दोन्ही राजधानींत स्वतःचं पद मोठं मानलं जात नाही.”
― वपुर्झा / VAPURZA: Leccion inagural del curso academico 1994-1995
― वपुर्झा / VAPURZA: Leccion inagural del curso academico 1994-1995
“काही काही लहान मुलांना ओळखीची गरज वाटत नाही. अनोळखी पाहुण्याने जरी कडेवर घेण्यासाठी हात पुढे केले तरी अशी मुलं त्यांच्याकडे झेपावतात. कविता पण तशाच असतात. हात पुढे करणारा माणूस आपल्याला खांद्दयावर खेळवणारा आहे, ह्याची खात्री पटली की त्या माणसाकडे त्या कायम मुक्कामाला येतात.”
―
―
“शृंगार आणि वैराग्य एकत्र नांदत नाहीत, त्याचप्रमाणे संशय आणि भक्ती . वैराग्य केवळ तारुण्यावर आघात करीत असेल, पण संशय उभ्या आयुष्याची राख करतो.”
― वपुर्झा / VAPURZA: Leccion inagural del curso academico 1994-1995
― वपुर्झा / VAPURZA: Leccion inagural del curso academico 1994-1995
“स्वाभाविक गोष्टींवर चिडण्यात अर्थच नसतो. भुंगे जमावेत म्हणून कमळ फुलत नाही, आणि एखादं कमळ पकडायचं असं ठरवून भुंगे भ्रमण करीत नाहीत. फुलणं हा कमळाचा धर्म, भुलणं हा भुंग्याचा धर्म. जाणकारांनी, रसिकांनी कमळाकडे पाहावं, भुंग्याकडे पाहावं आणि फुलावं कसं आणि भुलावं कसं हे शिकावं.”
― वपुर्झा / VAPURZA: Leccion inagural del curso academico 1994-1995
― वपुर्झा / VAPURZA: Leccion inagural del curso academico 1994-1995
“माणूस गर्दीचा झाला म्हणजे हरवत नाही. एकटा राह्यला की हरवतो.”
― पार्टनर [Partner]
― पार्टनर [Partner]
“पात्रता नसताना ह्या देशात फक्त एकच गोष्ट मिळते. ती म्हणजे मंत्रिपद, सत्ता.”
― पाणपोई [Panpoi]
― पाणपोई [Panpoi]
“प्रचंड आघातांनी माणूस तेवढा खचत नाही. कारण त्याच्या मनाची पूर्वतयारी झालेली असते. अनपेक्षित बारीकसारीक धक्क्यांनीच माणूस खचतो, कारण त्या प्रसंगांना तोंड देताना तो एकटा असतो.”
― गुलमोहर [Gulmohar]
― गुलमोहर [Gulmohar]
“आनंदाच्या प्रत्येकाच्या कल्पना निरनिराळ्या असतील. आनंद वेगळे आहेत; पण दु:ख एकच आहे याचं त्यांना समाधान वाटलं.”
― गुलमोहर [Gulmohar]
― गुलमोहर [Gulmohar]
“As you write more and more personal it becomes more and more Universal”
― पार्टनर [Partner]
― पार्टनर [Partner]
“सरकार कोसळलं की नवं राज्य स्थापन होईतो पहिल्या सरकारचीच ‘काळजीवाहू सरकार’ म्हणून नेमणूक करायची, हाच प्रचंड विनोद. सत्तेवर असताना ज्यांना काळजी घेता आली नाही, ते सत्ता गेल्यावर कोणती काळजी वाहणार? कदाचित”
― पाणपोई [Panpoi]
― पाणपोई [Panpoi]
“नाविन्याइतकी चटकन् शिळी होणारी दुसरी कोणतीही वस्तू नसेल.”
― तप्तपदी [Taptapadi]
― तप्तपदी [Taptapadi]
“माणसाजवळ पत हवी, ऐपत हवी आणि दुनियेला ठोकरण्याची जिगर हवी, मग दुनिया तुमचं कौतुक करते.”
― Ka Re Bhulalasi
― Ka Re Bhulalasi
“अापल्याला हवा तेव्हा तिसरा माणूस न जाणं हाच नरक !”
― पार्टनर [Partner]
― पार्टनर [Partner]
“अप्रिय वार्ता कानावर येण्याची ज्या प्रश्नामुळे शक्यता असते, त्यावेळी प्रश्न योग्य प्रकाराने निवडून विचारणं, हाही सुसंस्काराचाच भाग आहे.”
― सखी [Sakhi]
― सखी [Sakhi]
“एखाद्या घटनेतला ‘मी’ काढून टाकला तर समस्येवर उपाय हमखास मिळतो. कारण त्या परिस्थितीतलं ममत्व नाहीसं होतं.”
― Ka Re Bhulalasi
― Ka Re Bhulalasi
“जो नवा विचार देतो, तो गुरू!”
― Vapu85 (Marathi)
― Vapu85 (Marathi)
“कितीही उच्च पद मिळालं तरीही ते पोरकंच असतं. ‘पद’ लाभताक्षणी ‘पदर’ भेटावा लागतो. पदाबरोबरच जेव्हा पदर लाभतो, तेव्हाच लोखंडाचं सोन्यात रूपांतर करायची ताकद परिसाजवळ येते.”
― पाणपोई [Panpoi]
― पाणपोई [Panpoi]
“सर्व हळुवार, कोमल भावना गुंडाळून ठेवून निर्लज्ज कोडगेपणाने फक्त स्वार्थच पाहायचा ठरविला तर मग विश्वास, प्रेम, स्नेह सर्व कल्पनाच बाद ठरतात. कसलाही विधिनिषेध बाळगायचा नाही असं एकदा ठरवलं की मग वाईट तरी कशाचं वाटणार आहे?”
― दुनिया तुला विसरेल [Duniya Tula Visarel]
― दुनिया तुला विसरेल [Duniya Tula Visarel]
“PEOPLE BECOM MISERABLE BECAUSE THEY CONSTRUCT WALLS INSTEAD OF BRIDGES.”
― Ghar Haravleli Manasa
― Ghar Haravleli Manasa
“प्रत्येक माणूस म्हणजे एक कोडं आणि एक माणूस एकदाच, हे आणखी एक कोडं.”
― Aapan Sare Arjun (Marathi)
― Aapan Sare Arjun (Marathi)
“व्यवहारी माणसांत, समाजात चांगलं वागायचं ते केवळ वाईट दिसू नये म्हणून. म्हणजेच मूळ वृत्तीला विसरून रीत सांभाळायची. इथंच यातना आहेत. एखादाच बदल असा असतो की त्याचा मनानं स्वीकार केला जातो. बाकी सगळं लादलेलं असतं. प्रत्येक माणूस आयुष्यभर इतरांवर काही ना काही लादत असतो. प्रत्येक माणूस समोरच्या माणसाला स्वतःसारखं करण्याची धडपड करतो. जितक्या प्रमाणात समोरचा माणूस आपल्या मनाप्रमाणे वागेल तेवढ्याच प्रमाणात तो समोरच्या माणसावर प्रेम करतो. ह्या स्वरूपाचं प्रेम करणं हे प्रेमच नाही. ही स्वतःचीच पूजा झाली. समोरचा माणूस जसा असेल तसे स्वीकारणारे किती?”
― वपुर्झा / VAPURZA: Leccion inagural del curso academico 1994-1995
― वपुर्झा / VAPURZA: Leccion inagural del curso academico 1994-1995
“आज पन्नास वर्षं झाली तरी भारताचं भवितव्य अंधारात आहे. जग जिंकायची गोष्टच सोडा; दोन बाय दोन किंवा आणखी प्रशस्त असेल ती दिल्लीची खुर्ची मिळवताना मारामाऱ्या चालल्या आहेत. डायोझेनससारखा निःसंग नेता कधीतरी लाभेल का? मार्क”
― पाणपोई [Panpoi]
― पाणपोई [Panpoi]
“Everyone is bearing the brunt of the changing times. We may console ourselves by saying that there’s variety in the way we get pushed to the limit each time. We hold on to our egos as we strain under it. Egos that console us by saying that no one else could have borne the stress. That anyone else would have buckled. We get a strange kind of satisfaction when we see others suffer more than us. We are like the proverbial Arab in the story. The camels may keep changing.”
― Karmachari: Short Stories About Ordinary People
― Karmachari: Short Stories About Ordinary People
“आपल्या आवडीप्रमाणे सत्य बदलत नाही, बेटा. सत्यावरच आपली आवड बेताची असते. मी म्हणतो ते खरं आहे. संसार हा एक व्यवहार आहे, तडजोड आहे आणि तडजोड करणं हा माणसाचा स्वभाव झाला.”
― Ka Re Bhulalasi
― Ka Re Bhulalasi
“अगर अौर जीते रहते तो यही इंतजार होता.”
― पार्टनर [Partner]
― पार्टनर [Partner]
“ज्या ज्या ग्रंथांच्या वाचनाने माझी आतली ज्याेत जास्त प्रज्वलित होत आहे आणि प्रकाशाचं आकाश असीम होत आहे असेच ग्रंथ माझे गुरू आहेत.”
― वपु महोत्सव [Vapu Mahotsav]
― वपु महोत्सव [Vapu Mahotsav]

![पार्टनर [Partner] पार्टनर [Partner]](https://i.gr-assets.com/images/S/compressed.photo.goodreads.com/books/1313604520l/12388032._SY160_.jpg)
![वपुर्झा [Vapurza] वपुर्झा [Vapurza]](https://i.gr-assets.com/images/S/compressed.photo.goodreads.com/books/1351354743l/12841077._SX98_.jpg)
![ही वाट एकटीची [Hi Vat Ekatichi] ही वाट एकटीची [Hi Vat Ekatichi]](https://i.gr-assets.com/images/S/compressed.photo.goodreads.com/books/1324457862l/12943657._SY160_.jpg)
![आपण सारे अर्जुन [Aapan Sare Arjun] आपण सारे अर्जुन [Aapan Sare Arjun]](https://i.gr-assets.com/images/S/compressed.photo.goodreads.com/books/1351345596l/13313631._SX98_.jpg)