Goodreads helps you follow your favorite authors. Be the first to learn about new releases!
Start by following Narayan Dharap.

Narayan Dharap Narayan Dharap > Quotes

 (?)
Quotes are added by the Goodreads community and are not verified by Goodreads. (Learn more)
Showing 1-30 of 40
“पण वकील आणि पोलीस - दोघांचा संबंध झटका देणारा असतो.”
Narayan Dharap, संक्रमण [Sankraman: Ek Bhayavah Kadambari]
“माणसाचा स्वत:वरचा विश्वास काचपात्रासारखा असतो- एकदा तडकला की तडकलाच.”
Narayan Dharap, संक्रमण [Sankraman: Ek Bhayavah Kadambari]
“पिस्तुलातून सुटलेल्या गोळीला, धनुष्यातून सुटलेल्या बाणाला, कड्यावरून ढकललेल्या पाषाणाला कल्पना असते का आपण कोणत्या कार्यावर निघालो आहोत?”
Narayan Dharap, Shodh: Ek Bhayavah Kadambari
“तुला योग्य वाटेल तो मार्ग निवडायचं स्वातंत्र्य अर्थात तुला आहे, श्रीकांत. तुला उत्तेजन देणं किंवा परावृत्त करणं- त्यातलं काहीही मी करणार नाही; पण एक विचार तू केला आहेस का? तू निवडलेला मार्ग जगरहाटीला छेदून काटकोनात जाणारा आहे. आजवरचे अनुभव, बाह्मसुष्टीच्या स्वरूपाबद्दलच्या मनातल्या प्रतिमा आणि मनातले संकेत, सर्वकाही निरर्थक ठरणार आहे- त्या मार्गावर पाऊलखुणा नाहीत, खुणेचे दगड नाहीत, लँडमार्क नाहीत स्थळकाळाची चौकट विस्कटून जाते. अशा मितीत वावरताना मनोधैऱ्याची, आत्मविश्वासाची कसोटी लागते. केवळ जीवनच नाही, जीवनानंतरचं अनामिक; पण केवळ आयुष्य यांची बाजी लागते. तू याला तयार आहेस?”
Narayan Dharap, संक्रमण [Sankraman: Ek Bhayavah Kadambari]
“माणूस आणि पशू- विचारशीलता हीच माणसाची विशेषता आहे आणि तोच त्या दोघांतला फरक आहे. मानवाखेरीज इतर प्राणिजात (काही अपवाद वगळता) वर्तमानाच्या क्षणात जगत असते. होऊन गेलेल्या प्रसंगांच्या आठवणी, पुढे येणाऱ्या दिवसांबद्दल आशा- अपेक्षा-शंका इत्यादींचा बोजा त्यांच्या मेंदूवर नसतो. भूतकाळ आणि भविष्यकाळ- माणूस त्यांच्याकडे कधीही दुर्लक्ष करू शकत नाही. मागच्या घटनांवरून तो शिकत असतो, त्या आधारावर भावी आयुष्याचा मार्ग ठरवत असतो. ही विचारशीलता हेच त्याचं वैशिष्ट्य आहे.”
Narayan Dharap, संक्रमण [Sankraman: Ek Bhayavah Kadambari]
“दृष्टी आली की, समोर येईल ते पाहावंच लागतं. प्रिय असो वा अप्रिय असो. मघाशीच म्हणालो ना, देणगी फुकट कधीच मिळत नाही. त्याची काही ना काही किंमत मोजावीच लागते.”
Narayan Dharap, Chetkin: Ek Bhayavah Kadambari
“पूर्वीचा दिनक्रम केव्हाच उधळला गेला होता. त्यावेळी प्रसंगाना एक निश्चित काळ आणि वेळ होती- आता आयुष्य म्हणजे घड्या घड्या घातलेला एक कागद झाला होता- एक एक घडी उलगडली की, काहीतरी नवीन समोर येत होतं. नुसतं नवीन नाही- अविश्वसनीय, थरारक, भीतिदायक असं काहीतरी.”
Narayan Dharap, संक्रमण [Sankraman: Ek Bhayavah Kadambari]
“तिखट”
Narayan Dharap, Kaat: Kadambari
“माणूस स्वतःला अनेक घटनांचा कर्ता समजत असतो-पण निसर्गाच्या योजनेमध्ये माणसाला त्याला वाटतं एवढं महत्त्वाचं स्थान नाही”
Narayan Dharap, Shodh: Ek Bhayavah Kadambari
“कुतूहल म्हणजे मानवाला मिळालेला मोठा वर आहे, शापही आहे.”
Narayan Dharap, Chetkin: Ek Bhayavah Kadambari
“केवळ संकटाच्या वेळीच देवाची पूजा-अर्चा-प्रार्थना करण्याची आणि आवश्यकता नसली तर त्याला पार विसरून जायचं हा सोयिस्कर स्वार्थीपणा नव्हता का? देव म्हणजे काय एखादा टॉर्च होता की, फक्त अंधार पडला की लावायचा? खासच नाही. तो भक्तीचा दीप सतत मनात तेवत राहिला पाहिजे. शरीराला जसा नियमित व्यायामाने एक घाट येतो तसा नियमित देवअर्चनेने मनालाही एक घाट येत असला पाहिजे - त्यातूनच संकटाला सामोरं जाण्याची शक्ती मनात निर्माण होते;”
Narayan Dharap, संक्रमण [Sankraman: Ek Bhayavah Kadambari]
“तसं एकोणीस म्हणजे परिपक्क वय नाही-पण अगदीच अजाणही नाही. पण संवेदनक्षम खासच. सोळा सतरा वयापर्यंत काल्पनिक विश्वाचा मनावर जबरदस्त पगडा असतो. वीस-बावीसनंतर व्यवहारी कठोर जगाचा परिचय होतो. पण मधली ही काही वर्ष कल्पित आणि सत्य यांच्या सीमारेषेवरची वर्ष- अनेक दिशांनी अनेक प्रभाव पडून मनाची रस्सीखेच होत असते-”
Narayan Dharap, Shodh: Ek Bhayavah Kadambari
“स्वामीजी म्हणाले होते-शक्ती स्वत: निर्गुण असते. पाणी जसं पात्रानुसार रंग घेतं तशी शक्ती ती धारण करणाराच्या हेतूनुसार चांगली किंवा वाईट ठरते. शक्तीचं खरं स्वरूप जाणणं कदाचित मानवाच्या आकलनशक्तीच्या पलीकडचं असेल. मानव फक्त त्या शक्तीचा वापर करू शकत होता.”
Narayan Dharap, Shodh: Ek Bhayavah Kadambari
“आरामशीर”
Narayan Dharap, Kaat: Kadambari
“कोणीही मूर्ख नव्हतं, अव्यवहारी नव्हतं- फक्त सगळे असहाय होते.”
Narayan Dharap, Chetkin: Ek Bhayavah Kadambari
“शेवटी श्रद्धा आणि आत्मविश्वास- दोन्हीमध्ये प्रकाराप्रकारची शक्ती असतेच.”
Narayan Dharap, संक्रमण [Sankraman: Ek Bhayavah Kadambari]
“पण मनाची घडण कशी असते पाहा- मी जर आता काही केलं नाही, समोर (खरी वा काल्पनिक) संधी आली होती तिचा फायदा घेतला नाही, तर तो कृतघ्नपणा ठरेल अशी एक जाणीव सतत मनाला होत होती. प्रत्येकाचाच जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो. काय योग्य, काय अयोग्य याचे प्रत्येकाचे निकष वेगवेगळे असतात- त्यामागे त्याचे अनुभव, त्याचं ज्ञान, त्याचे विश्वास हे सर्व असतं.”
Narayan Dharap, संक्रमण [Sankraman: Ek Bhayavah Kadambari]
“तुमच्या आयुष्यात कितीही उलथापालथ झाली तरी सृष्टीचं दिवसरात्रीचं चक्र चालूच असतं. माणसाने तिकडे जरा डोळसपणे पाहिलं तर त्याच्या ध्यानात येतं खरोखरच, आपण किती क्षुल्लक आहोत!”
Narayan Dharap, Chetkin: Ek Bhayavah Kadambari
“शेवटी हा एक जुगारच आहे आणि आजच्या घटकेस तरी समाजातल्या आपल्या वर्गातला प्रत्येक तरुण, प्रत्येक तरुणी हा जुगार खेळत असतात. मग मी तरी त्याला अपवाद का ठरावं? मीही या जुगाराला तयार आहे- म्हणजे तुमची तयारी असली तर.”
Narayan Dharap, संक्रमण [Sankraman: Ek Bhayavah Kadambari]
“कधीकधी तो स्वतःशीच विचार करी. आपल्याला काय करायचं आहे? आपण काय साध्य करु शकतो? आपण कोणत्या क्षेत्रात प्राविण्य मिळवलं आहे? यापैकी कोणत्याही प्रश्नाला त्याच्यापाशी उत्तर नव्हतं. खरं तर भावी आयुष्यासंबंधात सल्ला देणारं कोणीतरी हवं होतं. नानांना विचारण्यात काही अर्थ नव्हता. एक तर त्यांचा अनुभव मर्यादित होता आणि त्याच्याविषयी विचार करताना त्यांना वस्तुनिष्ठ रहाणं अशक्यच होतं.”
Narayan Dharap, Shodh: Ek Bhayavah Kadambari
“व्यवहार म्हटलं की तडजोड ही आलीच.”
Narayan Dharap, संक्रमण [Sankraman: Ek Bhayavah Kadambari]
“साऱ्या जगाला वाटत होतं म्हातारी घरादाराचं रक्षण करण्यासाठी वाडीवर राहते आहे! चोराचिलटांपासून घराचं रक्षण करण्यासाठी! पण सोनाली, लोकानां माहीत नव्हतं की, थोरल्याबाई लोकांचं त्या घरापासून रक्षण करण्यासाठी वाडीवर राहत होत्या!”
Narayan Dharap, Chetkin: Ek Bhayavah Kadambari
“वाड्यात पैसा- संपत्ती- ऐशआराम सर्वकाही होतं; पण त्यात एक जालीम जहर होतं आणि हे जहर कणाकणाने माझ्या सर्वांगात झिरपणार होतं.”
Narayan Dharap, संक्रमण [Sankraman: Ek Bhayavah Kadambari]
“आता वय नव्वदीच्या पुढे गेलं आहे. बरोबरचे सर्वजण आपापल्या वाटांनी गेले-त्यांच्या प्राक्तनात जे काही असेल ते भोगण्यासाठी गेले. माझेही आता हे अखेरचेच दिवस आहेत. भूतकाळाबद्दल माझ्या मनात पश्चात्ताप नाही, भविष्याबद्दल भीती-चिंता-अपेक्षा नाही. कोणी मदतीसाठी आलं तर मदत करतो-पण ती पैशांसाठी नाही-कारण त्याची मला आता गरज नाही. एक बौद्धिक कुतूहल म्हणून मदत करतो. एक आव्हान म्हणून त्याचा स्वीकार करतो.”
Narayan Dharap, Shodh: Ek Bhayavah Kadambari
“तुम्ही जर आसपास पाहिलंत तर एकट्या एकट्याने आयुष्य कंठणाऱ्या कितीतरी व्यक्ती तुम्हाला दिसतील. त्यांच्या आयुष्याचे इतिहास आपल्याला माहीत नसतात. काहींनी स्वेच्छेने एकाकीपणा पसंत केलेला असतो, तर काहींच्यावर असा एकाकीपणा लादला गेलेला असतो. ते सुखी असतात की दु:खी असतात?.”
Narayan Dharap, संक्रमण [Sankraman: Ek Bhayavah Kadambari]
“उपेक्षा ही जगातली सर्वांत क्रूर गोष्ट आहे.”
Narayan Dharap, लुचाई [Luchai: Ek Bhayavah Kadambari]
“श्रीकांत दामले म्हणजे सर्वसाधारण मानव. समाजातल्या तिशीच्या पिढीचा अगदी प्रतीकात्मक नमुना. या वयोगटातले वरचे वीस टक्के लोक यशामागे, अर्थप्राप्तीमागे मटेरियल वेल्थमागे लागलेले, सतत कामात गुंतलेले- तर खालचे वीस टक्के आयुष्याच्या स्पर्धेत मागे पडलेले, मनोमन खचलेले, सदासर्वदा मागच्याच रांगेत राहणारे. मधला भाग हा बऱ्यापैकी यशस्वी, समाधानी, सामाजिक- कौटुंबिक, व्यक्तिगत नीतिनियमांना मानणारा, कर्तव्याचा आदर करणारा- अशांपैकी श्रीकांत. त्याच्या आयुष्याचा आलेख म्हणजे ठरावीक स्लोपने चढत जाणारी सरळरेषा- बृहन्लेखन अगदी सोपं.”
Narayan Dharap, संक्रमण [Sankraman: Ek Bhayavah Kadambari]
“विजेच्या एखाद्या जिवंत तारेस अज्ञानाने, अजाणतेपणाने स्पर्श झाला तरी शॉक हा बसणारच!”
Narayan Dharap, संक्रमण [Sankraman: Ek Bhayavah Kadambari]
“व्यवहारात माणसाने सावध राहिलं पाहिजे. माणसांची पारख करता यायला पाहिजे. कुणाला जवळ करायचं, कुणाला चार हात दूर ठेवायचं, कुणाच्या वाऱ्यालासुद्धा उभं राहायचं नाही- हे ज्ञान उपजत नसतं; पण अनुभवांनी शिकून घ्यावं लागतं. स्तुतिपाठक श्रीमंतांभोवती तर गर्दी करणारच; पण त्यांच्यातला कोण आपमतलबी, ढोंगी, फसवा, लबाड हे समजायला हवं.”
Narayan Dharap, Chetkin: Ek Bhayavah Kadambari
“माणसाला सगळ्याची सवय होते. भीतीचीसुद्धा सवय होते.”
Narayan Dharap, Chetkin: Ek Bhayavah Kadambari

« previous 1
All Quotes | Add A Quote