V.P. Kale's Blog
August 30, 2010
तप्तपदी
"लग्नासारखा एक निर्णय आबाद किंवा बरबाद करायला पुरेसा असतो.अशा वेळी व्यक्ती स्वतंत्र हवी."
"समस्या आणि उत्तर ह्यात वेळ म्हणजे Time Factor असतो.Forth Dimension म्हणतात तो Factor.म्हणुनच एका उत्तराची वेळ टळली की दुसरं उत्तर शोधावचं लागतं."
"उत्तम आणि उच्च पदवी हीसुद्धा ऎपतच आहे.नुसत स्वाभिमान आहे,पण कोणतीच पात्रता नाही ती माणसं जास्तीत जास्त मग्रुर असतात."
"एखादी व्यक्ती जाता-जाता जेव्हा आपल्याला अपेक्षित नसलेला कॉमेंट करते.तेव्हा त्यांच फ़क्त नवल वाटतं.पण केव्हातरी सगळ्या आयुष्याचा पट उलगडुन बसण्याचा क्षण येतो तेव्हाच त्या माणसाचे खरे विचार समजतात.पृष्ठभागावरुन नुसतचं वाहुन गेलेलं पाणी किती आणि जमिनीने धरुन ठेवलेलं किती हे ’बोअरवेल’ खणल्याशिवाय कळत नाही.वर्ष संपलं की आपण नवीन Calender आणतो.काही वाणसामानाबरोबर फ़ुकट येतात.कधीकधी Calender साठी आपण अनावश्यक वस्तुही घेतो.प्रत्येक महीन्याला वेगवेगळं चित्र असलेलं,कधी जाहीरपणे लावता न येणारं किंवा लावता येणारं,भारी Calender ही आपण पळवलेलं असतं.कितीही आकर्षक -आकर्षक म्हटलं तरी त्याच नाविन्य किती काळ?
नाविण्याइअतकी चटकन शिळी होणारी दुसरी कोणतीही वस्तु नसेल.भिंतीकडेच पाहत आयुष्य घालवणार्या रिकामटेकड्यांना Calender वर कुठलही चित्र चालतं.व्यक्तीमत्व घडवणार्या माणसांच्या बाबतीत,तारखांचे चौकोन जास्त सचित्र असतात.प्रत्येक चौकोनावर वेगळं चित्र,वेगळा विचार,वेगळी प्रगती,वेगळं शिखर.तो पट जेव्हा जेव्हा उलगडला जातो तेव्हाच समोरच्या माणसाला जाणवतं की,प्रत्येक श्वासाचं दाम मोजुन श्याम विकत घेणारी गदिमांची नायिका आणि समोरचा माणुस एकच आहे.बुद्धी,मन आणि शरीराच दान करुन ह्या माणसाने Calender चा कालनिर्णय स्वतः विकत घेतला आहे."
June 30, 2008
प्लेझर बाँक्स १
संध्याकाळच्या संधीप्रकाशातही जो टवटवीत राहीला त्याने दिवस जिंकला.'अंत' आणि 'एकांत' ह्यापैकी माणूस एकांतालाच जास्त घाबरतो.
It is better to have loved and lost than never to have loved at all !
अत्यंत महागडी, न परवडणारी खर्या अर्थाने ज्याची हानी भरुन येत नाही अशी गोष्ट किती उरली आहे ह्याचा हिशोब नसताना आपण जी वारेमाप उधळतो ती म्हणजे "आयुष्य".
जोपर्यंत स्व:तच्या विचारांचा शोध स्वतलाच लागलेला नसतो तोपर्यंत ठीक चाललेलं असतं सगळ्यांचं.
जीवनाचा साथीदार म्हणुन 'क्ष' व्यक्तिला पसंत करायचं, त्या व्यकितबरोबर आयुष्य घालवायचं, त्याला शरिर अर्पण करायचं, पण मनाची कवाडं उघडी करायला मात्र तिथं वाव नसावा.हीच माणसांची केवढी मोठी शोकांतिका? ह्याला संसार म्हणायचं.
Love decides what is wrong, instead of who is wrong.
माणुस नावाच्या एका अवाढव्य, अनाकलनीय यंत्राचा सेफ़्टी व्हाल्व्ह शब्द आणी संवाद हा आहे.
पहिल्या वहिल्या भेटीत माणसं किती जवळची व्हावीत याला काही हिशोब असतो का? गणित असतं का?मैत्री म्हटलं की खरं तर हीशोब, गणितं वगैरे व्यवहारीक शब्द टीकतच नाहीत. तरीही हेच शब्द पटकन पुढाकार का घेतात?
कुठलेही हिशोब न ठेवता जी गणीताप्रमाणे नेमकेपणा देते ती मैत्री.
जो शब्द नाकारतो तो विचारच नाकारतो.
मैत्री म्हटलं की काय असावं काय नसावं ह्याचं चिंतन करावं.
प्रत्येक ठिकाणी जाण्यासाठी मन धावत होतं. हे मनाचं प्रकरण छान आहे. जागा न सोडता ते हजारो मैल भटकतं आणि सगळ्यांना भेटतं. पण शरीर त्यापैकी एक दोन ठीकाणीच जाऊ शकतं.
कोणत्याही नव्या "अनुभवाला" समोर जाताना प्रत्येक मनात एकमेव ईच्छा असते. तो अनुभव चांगला असावा. अपेक्षापुर्ती करणारा असावा.
जो माणुस जीवनाला कंटाळलाय, वैतागलाय त्यला एवढचं विचारावसं वाटतं "राजा, तू कधि लताचं गाणं ऐकलयंस? ' रसिक बलमा ' किंवा ' ओ बसंती ' डोळे मिटुन तंद्रित ऐकलयसं. आणी जर नसलसं तर ऐक.पुन्हा पुन्हा ऐकत रहा. तुला जगावसं वाटेल.आणी असं वाटत असतानाच तु वपुंच्या कथा ऐक. तुला कधिच मरावसं वाटणार नाही.
May 22, 2008
तू भ्रमत आहासी वाया
’ये,पण नुसती पडून रहा.माझ्याजवळ येऊन रडायला लागलीस की मी सांत्वनासाठी शब्द शोधणार.सांत्वनासाठी आजवर जगात कुणालाही शब्द सापडले नसतील.सांत्वन म्हणजे दुःखाच मूल.मूल आईपेक्षा मोठं कसं होईल?मूल मोठं व्हायला लागलं की आई आणखी मोठी व्हायला लागते.म्हणून,समजूत घालणारं कुणी भेटलं म्हणजे हुंदके वाढतात.हसता हसता माणूस एका क्षणात थांबू शकतो.दुःखातली व्यक्ती रडणं एका क्षणात विसरू शकत नाही.तेव्हा तू जा.बाहेर पड.एकांत शोध.तिथं तू तुझी डिग्री विसरशील.समजुतीला कुणी येणार नाही.शांत होण्याचे इशारे आतूनच उमटतील,मग आपोआप शांत होशील.’
’तू हे बोलतेस? नवल आहे.एकाकीपण वेगळं,एकांत वेगळा,एकांताची माझी व्याख्या फार वेगळी आहे.परिसराचं मौन म्हणजे एकांत.आणि परिवारात असतानाही निराधार वाटणं हे एकाकीपण.तेव्हा तू एकांतात जा,मनसोक्त रड.जमिनीला अश्रू हवे असतात.मातीचं देणं चुकवलं की हलकी होशील.वर चढशील,आकाशाजवळ पोहोचशील.असचं कोणतं तरी दुःख पार केल्यावर तुकाराम,’तुका आकशाएवढा’ असं लिहून गेला असेल.’
’ह्या बाबतीत नाही.तू ह्याक्षणी गुरू शोधूही नकोस.गुरूचा आधार शोधणं म्हणजे एक सुसंधी हातची गमावणं.’
"प्रियकर परिपूर्ण असतो.नवर्याला मर्यादा असतात" कारण ’संसार हा व्यवहार आहे.प्रियकराच्या बाबतीत संपूर्ण समर्पण असतं.’मी’ उरत नाही.म्हणून संघर्ष नसतो.संसारात तसं होत नाही.’
’प्रेम म्हणजे मरण असतं.’मी’ हा शब्द प्रेमात आणि भकतीत उरत नाही.मरणात तेच होतं.ज्याला जिवंतपणी मरण अनुभवायचं आहे,तोच खरं प्रेम करु शकतो.’
’सुर्यप्रकाश वाढू लागला की दंवबिंदू आपोआप नाहीसे होतात.’
’अंधार्या वाटेवर क्षणभर विजेचा प्रकाश पडतो.वीज चमकून नाहीशी झाली की अंधार जास्त गडद होतो.मग काही काळ चालणं अवघड जातं.म्हणून सांगतो.गुरू शोधू नकोस.चालणं,ठेचकाळणं,रक्तबंबाळ होणं,एकाकी पडणं,दरीत कोसळणं,हे सगळ घडू दे.नियती,प्रारब्ध हे अड्थळे मानू नकोस.ते सौभाग्य आहे.आगीतून जा.कचरा जळून जाईल.सोनं उरेल.प्रेमपुर्तीत साफ़ल्याची शंका असते,प्रेमभंगातलं वैफ़ल्य नवी पायवाट शोधायला लावते,स्वतःच्या मालकीची’
’अनुभव घेणारा प्रत्येकजण वेगळा असतो’
’आयुष्याच्या प्रवासात एकाची तत्वं दुसर्याला थेअरी वाटते.’
’कबुतराला गरूडाचे पंख लावता येत नाहीत.कदाचित लावता येतीलही,पण गगनभरारीचं वेड रक्तातच असावं लागतं. आकाशाची ओढही दत्तक घेता येत नाही.’
’रडणं भोगायचं असतं.हसणं उपभोगायचं असतं. ह्याच कारणासाठी आनंदाला परिवार हवा,सगेसोयरे हवेत. आनंदाला सहल हवी,दुःखाला घर हवं.कारणही हवं.’
’व्यवहाराला गंध नसतो.स्पर्श नसतो.सूर नसतो.गोंगाट असतो.रूचीच नसते मग अभिरूचीची बातच दूर.’
’प्लास्टीक़च्या फ़ुलांना फक्त धुळीचा शाप.सर्फनं धुतली की झालं.पण नळाखाली धरल्यावर ती शहारून येत नाहीत.जन्म-मरणाचाच फ़ेरा नसेल,तर शहारे-रोमांच,आसक्ती,विरह मिलन,भय,सगळ्यातूनच मुक्ती.जिवंत फ़ुलं स्वाभिमानी असतात.धुळीचा थर जमण्याआधीच मरण पत्करतात.
निर्माल्य म्हणजे हौतात्म्य.
धुळिचा पेहराव म्हणजे अमरता.’
April 12, 2008
गुलमोहर
जगातील कुठलीच गोष्ट परिपुर्ण नाही. परमेश्वरानं सोनं निर्माण केलं. चाफ़्याची फ़ुलं सुद्धा त्यानंच निर्माण केली. मग त्याला सोन्याला चाफ़्याचा वास नसता का देता आला ? अपुर्णतेतही काही मजा आहेच की..
सोन्याकडून सुवासाची अपेक्षा मुळीच नाही, पण कमीतकमी सोन्याचे गुणधर्म तरी पूर्णत्वाने हवेत की नाहीत ?
अपुर्णतेत मजा आहे; पण माणूस ते कुठपर्यंत मानतो? जोपर्यंत ती अपुर्णता त्याच्या वाट्याला येत नाही तोपर्यंतच.
माणसं कृती विसरतात , पण हवेत विरणारे शब्द मात्र धरून ठेवतात...
आपण हरवण्यासारखं आयुष्यात जरूर घडायला हवं , कारण अशा स्थळावरून परतताना माणूस ’माणूस’ राहत नाही, तर परतून येतं ते चैतन्य..
वार्याने उडवून दिलेल्या पाचोळ्याला आपण कुठे पडावं,कसं पडावं, जमिनीवर पडावं की पाण्यावर पडावं असं काही मत असतं का ?
ओळखी केल्याने सौख्याइतकाच त्रास पण होतो. एखाद्याची ओळख होते व नाविन्याला चटावलेले माणसाचे मन त्या ओळखीचाच विचार करत बसते , शेवटी ही ओळख इतकी वाढत जाते की त्या ओळखीचेच बंधन होते आणि कोणत्याही कारणाने त्या व्यक्तीच्या वागण्यात काही फ़रक झाला की आपण त्याचीच काळजी करत बसतो की " आता हा असा का वागला ?"
पाठीला चमत्कारिक ठिकाणी खाज सुटावी , आपला हात वर पोहचत नाही व दुसर्याला नक्की जागा सापडत नाही अशी अवस्था जीवनात ही बर्याचदा होते..
November 15, 2007
सखी
...चांदणं चांदणंच असतं. त्याला ग्रेड्स नाहीत. डिग्री नाही. डिग्री नाही म्हणुन अहंकार नाही. म्हणुनच गोंगाट नाही. ते नम्र असतं. उन्हाप्रमाणे चांदण्याजवळ तरतमभाव नाही. ते जितकं प्रखर, तितकं सौम्य. चंद्राइतकं औदार्य माणसांना मिळवता येईल का? अमावस्येला स्वत:चं अस्तित्वही न दर्शवण्याचा निरहंकार फ़क्त चंद्रासारख्या महान ग्रहाजवळच असू शकतो!माणसं चंद्रासारखी शीतल का होत नाहीत? एकच कारण.
ती चंद्राची उपेक्षा करतात. रात्री झोपा काढतात. एका चतुर्थीत सगळं देणं चुकवतात. त्यातही भक्ती किती? आणी अहंकार किती?
उपवास करणार्यांचा परिवारावर एक अनामिक पगडा असतो. दडपण असतं. चंद्राची शीतलता उचलणं हेच व्रत. त्याच्या शीतलतेचं अनुकरण केलं तर घरात चांदणं पहुडेल.
पण त्या शीतलतेशी घनिष्ठ मैत्री हवी. ती झोपून कशी मिळणार?
त्यासाठी हे असं चांदण्यांशी संधान जुळवलं पाहिजे.
समुद्रासारखा जीवही चंद्र दिसला की झेपावतो. मिठाला जागतो. मग माणसं अशी थंड का? ती शांत असतील तर उत्तम. पण ती थंड म्हणजे निर्विकार असतात.
कितीही मोठा आवाज केला गेला तरीही तरी तो जास्तीत जास्त किती मैलांचा प्रवास करील? केव्हातरी नि:शब्दाची सीमा सुरू होणारच. मौनाचं तसं नाही. त्याला सीमा नाही. म्हणुनच आक्रोशाला शब्द असतात. अतीव आनंद 'मूक' असतो. माणूस नि:शब्द होतो.
श्वास म्हणजे विश्वाशी सोयरीक. म्हणूनच अत्यंत जिवाभावाची व्यक्ती गेली तर 'मी एक क्षण जगणार नाही' असं अनेक म्हण्तात आणि मागे खुप वर्षे राहतात. त्यचं प्रेम खोटं नसतं, पण विश्वाशी सोयरीक तुटलेली नाही हे त्यांना माहीत नसतं.
प्रकाश रोकठोक असतो. लपवालपवीचा खेळ फ़क्त अंधारापाशी असतो. अंधार आणी आतल्या गाठीची माणसं सारखीच.
प्रवासात हे असे डोंगराएवढे उंच, आकाशाइतके विशाल, वृक्षांसारके सावली देणारे, खळखळाट करीत झेपावणारे प्रपात पाहिले म्हणजे मला पैसा-प्रतिष्टा, पद ह्यामागे धावणारा माणूस फ़ार केविलवाणा वाटतो.
समाज तप्त सुर्यासारखा असतो. आगीचा कितीही वर्षाव झाला तरीही ती सूर्यफ़ुलं सूर्याकडेच पाहत राहतात. तोंड फ़िरवीत नाहीत. माझ्यासारख्या निराधार बाईकडे समाज असाच बघत असतो. सूर्यासारखा रोखून. अशा समाजाला तोंड देतानाही टवटवीत रहायचं हे मला सूर्यफ़ुलांनी शिकवलं.
ज्या माणसाशी आपण मैत्री करतो, त्याला अंश:त का होईना, समृध्द करण्याची पात्रता आपल्यापाशी आहे का हे पहाव.
एक ओढा आहे. किंवा झरा समज. एका उडीत आपल्याला तो पार करता येईल असा नसतो. त्या प्रवाहाच्या मध्यभागी एक मोठा दगड असतो. त्याचा आधार देऊन दोन टप्प्यांत आपण पलीकडच्या तीरावर जातो. तो मधला दगड म्हणजे 'सेक्स'. ते साधन असावं. साध्य नसावं.
सावली देऊ शकणार्या वटवृक्षानं विश्रांतीला आलेल्या पांथस्थाला बाकीची झाडं सोडून तुला नेमका मीच सापडलो का, असं विचारायचं नसतं.
लेखकाच्या संदेशावर जग बदललं असतं तर समर्थांच्या मनाच्या श्लोकानंतर कोणत्याच वाड:मयाची, साहित्याची निर्मीती झाली नसती.
चांदी-शुध्द चांदीचीच भांडी काळी पडतात. त्यातली चांदी नाहीशी होत नाही. थोडं पाँलिश केलं की झालं.
October 29, 2007
वपु ८५
कोर्टात न्याय मिळत नसून, कोर्टात जे मिळतं त्याला न्याय म्हणावा लागतो.
जास्तीत जास्त प्रवासाचे पैसे भरून दोन दोन तास एअर पोर्टवर थांबायचं. पहाटे वेळी अवेळी उठायचं. फासावर जाणार्या आरोपीप्रमाणे झडती घ्यायची ह्या सगळ्या सक्तमजुरीला स्टेटस म्हणायचं.
करकचुन ताटी बांधन्यापासून चिता रचेपर्यंत, कुठेच शिस्त नाही, सौंदर्य नाही. मरण सुरेख असेलही. आपण ते रूक्ष बनवतो.
मरणातील काव्य, सौंदर्य, उदात्तता ह्याची जपणूक ख्रिश्चन लोकांनी केली आहे, हे त्यांच्या अंत यात्रेवरून कळतं. आम्हाला फक्त विध्वंस करता येतो.
'नजर आणि स्पर्श, प्रेमाची ही भावना इतकी सर्व श्रेष्ट भावना आहे की नुसते शब्द कमी पडणार आहेत, हे जाणूनच निसर्गानं स्पर्श निर्माण केला. म्हणूनच प्रेमाची सांगता स्पर्शाशिवाय होत नाही.'
October 27, 2007
रंग मनाचे
' नावात काय आहे?' - हा प्रश्न तसा जगजाहीर.नावात खरचं तसं काही नाही.ते नाव घेवुन तुम्ही कोणत्या गावात जन्म घेतला ह्याला जास्त महत्व. तुम्हांला कोणते आईवडील लाभले त्यावर बरचसं अवलंबुन.तुमचा बँकबँलन्स पण नजरेआड करता येणार नाही.पण तरीही ह्या सगळ्या गोष्टी तराजुतल्या एका ताटलीतल्या.दुसरी ताटली तुमची स्व:तची.ती आकाशाला शरण जाते की आपली माती वेगळीच म्हणत जमिनीकडे झुकते त्यावर सगळं अवलंबुन.
'इट जस्ट हँपन्स' म्हणत पुढच्याच क्षणी जी माणसं कामाला लागतात , ती जास्त जगतात.अश्रू गाळण्यात आपलं वीस टक्के आयुष्य वाया जात असेल.काही माणसांचं तितके टक्के आयुष्य इतरांच्या नावाने बोटं मोडण्यात जातं.
पुढच्याच क्षणी मागचा क्षण विसरणारे अलिप्त, कृतघ्न, वास्तववादी, की हे सगळे समर्थांचे शिष्य?
'मरे एक त्याचा, दुजा शोक वाहे, अकस्मात तोही, पुढे जात आहे.'
अकरा शब्दांत समर्थांनी सगळं आयुष्य उकलुन दाखवलं.
कोणत्याही व्यक्तिच्या मृत्यूबद्दल, त्याची हळहळ संपली की स्मारकं संपली.
राहतात त्या तसबिरी.
दुर्गुणांना अनेक रुपं धारण करता येतात.आणी इतकी ती आकर्षक असतात.
माणसाच्या मनाचे व्यापार सहजासहजी कसे समजणार?ज्याचा तोही सांगु शक्त नाही, मग इतरांनी शिक्के मारायची घाई का करावी?
नियतीचं माणसाला काही सुखांना पारखं करते,तेव्हा तिथे इलाजच नसतो.पण, त्याहीपेक्षा, माणुस जेव्हा दुसर्या माणसाचं आयुष्य वैराण करतो त्याचं शल्य जास्त.
सुविचारांची वही ही नंतर शोभेची वस्तु होते..
ऐश्वर्य आणी सौंदर्य यांना मदत करायला सगळेच झटत असतात.
समाजातला वावर सांभाळुन केला पाहीजे. सौंदर्याने आपलं अस्तित्व स्वत:पुरतचं ठेवायला हवं.
शिंपलीतला मोती, शिंपली उघडली तरच दिसतो. तसचं सौंदर्य निराकाराच्या अवगुंठनात नांदाव.
आपल्याला मुद्देसुद बोलता येत नाही, स्वत:चं म्हणणं ठासून मांडता येत नाही, समोरच्या कोणत्याही माणसासमोर नमतं घ्यावं लागतं ह्याची काहींना जाणीव असते. आणी त्यांची त्यांना चीडही येते. म्हणूनच कोणत्याही चर्चेच्या बाबतीत अशा माणसांना प्रारंभ जमतो. एक-दोन विधानं ती माणसं सुसंगतपणे करतात. त्यांच्या विधानांना तोडीस तोड तर्कशुध्द उत्तरं मिळू लागली की मग फ़ार काळ त्यांना टिकाव धरता येत नाही. मग त्यांचा तोल जातो. तोल गेला की आरोप असंबध्द व्हायला लागतात. चर्चेचा शेवट निव्वळ त्राग्यात होतो.
तंत्रावर फ़क्त यंत्रच जिंकता येतात. मन जिंकण्यासाठी मंत्र सापडावा लागतो.
चप्पल काय आणी संसार काय. तो कुणाच्या हातात पडतो यावर अवलंबून.
बाणेदार माणसालाच बाणॆदारपणाची किंमत किती मोजावी लागते ते समजतं. अशा वेळी डोळ्यांतून येऊ पाहणार्या पाण्याला सांत्वन नको असतं. स्वतचा पराभव जेव्हा स्वत:जवळही मान्य करावासा वाटत नाही, तेव्हा डोळ्यांतून येणारं पाणी पापणीच्या काठावरुन आत जिरवायचं असतं.
चांगलं आणी वाईट ह्या शब्दांना स्वतंत्र अर्थ आणी अस्तित्व असतं का?
'हो' आणी 'नाही'ही.
'तुलना' नावाची राक्षसीण जोपर्यंत मध्ये उभी राहत नाही, तोपर्यंत ह्या शब्दांचा विहार चालतो. तिने हस्तक्षेप केला की संपलं! ही राक्षसीण येताना एकटी येत नाही, तिच्याबरोबर तिची बहीण येते. ती तुम्हांला बहीणीच्या स्वाधीन करते आणी दुसर्या मनाचा बळी घेण्यासाठी ती निघुन जाते.
ह्या बहीणीचे नाव 'तडजोड'. ही तुम्हांला आयुष्यभर साथ देते.
आर्थिक झळ किंवा तूट भरुन काढता येते. शारीरिक हानी भरुन काढताना जरा क्लेश होतात आणी त्याची शाश्वती नाही. पण गेलेली वेळ मात्र कधिच परत येत नाही.
परमेश्वराने माणसाला दोन गोष्टी बहाल केल्या . दोन हात आणी एक मन. माणसाने बेदम कष्ट करावेत आणी उदंड प्रेम करावं. उदंड प्रेम करणारी माणसं कशाचीच गँरंटी मागत नाहीत. माणसाने हे प्रेम करायची शक्ती घालविली म्हणुन आता नियतीसुध्दा कसलीच गँरंटी देत नाही. संतांच उदंड प्रेम परमेश्वरावर असतं. म्हणुन संत कसलीच हमी मागत नाहीत. ते निर्भय असतात.
जिथे उमटलेला ठसा जतन केला जाईल, तिथेच शिक्का उमटावा.
नाहीतर ते निवडणुकीचे शिक्के होतात.
दूध अचानकपणे, म्हणजे आपण तंद्रीत असताना, कोणत्या तरी क्षणी लाट अंगावर येते, त्या वेगाने वर काठापर्यंत येतं. चिमटा शोधायला वेळ नसतो. अशा वेळेला पाण्याचा शिडकावा करुन ते तिथल्या तिथे शांत करायचं असतं. थांबवायचं असतं. मग सावकाश चिमटा शोधावा, उसंत घेऊन ते खाली उतरवावं.
चार गोड शब्द बोलणं म्हणजे इवल्याशा खारीच्या पाठीवर रामाची बोटं उमटवणं.
नवरा आणी नियती यात फ़रक काय?
सगळ्या स्त्रियांमागे हात धुऊन लागायला नियतीला वेळ पुरत नसावा, म्हणुनच तिने नवरा नावाचा प्राणी निर्माण केला. तिच्याइतकाच लहरी.
मुर्ख प्रश्नांना तशीच उत्तरं सतत शोधण्याचा आणी त्याची पुर्वतयारी करण्याचा ताण विलक्षण असतो. त्यात आपण चांगलं काम करण्याची शक्ती गमावून बसतो.
वैकुंठ, शिक्षण, पदव्या ह्या गोष्टी चिलखतासारख्या वागवायच्या .व्यावहारीक युध्द जिंकण्यासाठी.
संसारात मन आणी माणुसकी हेच महत्वाचं. तिथं ही मोठेपणाची चिलखतं कशासाठी? संसाराची व्यवहारिक बाजू डिग्रीवरच चालते.
संसार ही एक जबाबदारी असते. त्याचं ओझं व्हायला लागलं की गंमत गेली.
प्रेम, मैत्री, संगोपन, शुश्रूषा ह्या सगळया जबाबदार्या त्याचं ओझं वाटलं की सहजता गेली.
" ओझं हीदेखील जबाबदारी नसते का?"
"ओझं दिसतं कारण ते लादलेलं असतं. जबाबदारी स्विकारलेली असते.
ओझं हीच जर जबाबदारी असती तर तुमच्या पाचशे रुपयांच्या बँग्ज विमानातल्या कर्मचार्यांनी फ़ेकुन तोडल्या असत्या का? "
संघर्ष न वाढवता नांदावं कसं हे सहज जमतं. त्यासाठी खुप अक्कल लागते, असं नाही.
लागतो तो पेशन्स आणि संघर्षाशिवाय जगावं ही तळमळ.
मन:स्ताप ही अवस्था अटळ. पण आपणच संघर्ष टाळू शकलो तर... तडा गेलेल्या काचेच्या भांड्याचे दोन्ही तुकडे जागच्या जागी राहतात.त्यातून पाणी पिता आलं नाही तर त्यात फ़ुलं ठेवता येतात.
October 26, 2007
वपुर्झा
आमचा देव दगडाचा नाही. आम्ही दगडात देव पाहणारी माणसं आहोत. दगडात देव असतोच, मुर्ती असतेच.दगडाचा फ़क्त नको असलेला भाग काढुन टाकायचा असतो.मुर्तीच्या भागाकडे फ़क्त लक्ष ठेवा. फ़ेकुन द्यायच्या भागाकडे नको. आणी मग ह्याच भावनेनं, निसर्गातल्या इतर गोष्टींकडे पहा. झाडं, नद्या, वारे, आकाश, जमीन आणी शेवटी माणुस. माणसातलाही नको असलेला भाग दूर करायला शिका. ह्याची सुरुवात स्व:तपासुन करा. स्व:तला नको असलेला भाग कोणता? तर ज्यापायी आपला आनंद, प्रगती, निष्टा आणी आत्मविश्वास ह्याला तडा जातो तो आचार, तो विचार हा टाकायचा भाग..'स्त्री’ ला जन्माला घालताना परमेश्वराने तिला विचारलं, 'तुला बुद्धी हवी का सौंदर्य?’ तेंव्हा ती स्त्री म्हणाली, 'बुद्धीची गरज नाही, सौंदर्यच दे! 'का?' 'बुद्धीच्या सामर्थ्यावर सौंदर्य मिळवता येत नाही, पण सौंदर्याच्या जोरावर बुद्धी विकत घेता येते.’
"आपत्ती पण अशी यावी कि तिचा इतरांना हेवा वाटावा....व्यक्तिचा कस लागावा.पडायचंच असेल तर, ठेच लागुन पडू नये, चांगलं २००० फ़ुटांवरुन पडावं..म्हणजे माणूस किती उंचावर पोचला होता हे तरी जगाला समजेल. !"
पशू माणसांपेक्षा जास्त श्रेष्ठ आहेत कारण ते INSTINCT वर जगतात...बेदम वजन वाढलंय म्हणून घारीला उडता येत नाही, किंवा एखादा मासा बुडाला असं कधी ऐकलंय का ?
एकदा केव्हातरी शांतपणे बसावं आणि वयानुसार आपण काय काय गोष्टी सोडल्या ह्याचा आढावा घ्याचा. मग लक्षात येतं, की आपण गाभुळलेली चिंच बरयाच वर्षात खाल्ली नाही, जत्रेत मिळणारी पत्र्याची शिट्टी वाजवलेली नाही. चटक्याच्या बिया घासुन चटके द्यावेत असं आता वाटत नाही, कारण परीस्थितीचे चटके सोसतानाच पुरेवाट झालेली असते. कॅलिडोस्कोप बघितलेला नाही. सर्कशितला जोकर आता आपलं मन रिझवु शकत नाही. तसंच कापसाची म्हातारी पकडण्याचा चार्मही आता राहीलेला नाही. कापसाच्या त्या म्हातारीने उडता उडता आपला "बाळपणीचा काळ सुखाचा " स्वत: बरोबर कधी नेला ते कळलंच नाही. त्या ऊडणारया म्हातारीने सर्व आनंद नेले. त्याच्या बदल्यात तिच वार्धक्य तिने आपल्याला दिलं. म्हणुन ती अजुनही ऊडु शकते. आपण जमिनीवरच आहोत
जाळायला काही नसलं की पेटलेली काडीसुद्धा आपोआप विझते.
खर्च झाल्याचं दु:ख नसतं, हिशोब लागला नाही की त्रास होतो.
प्रॉब्लेम्स नसतात कोणाला? ते शेवटपर्यंत असतात. पण प्रत्येक प्रॉब्लेमला उत्तर हे असतचं. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा तर कधी माणसं या तिन्ही गोष्टीपलिकडचा प्रॉब्लेम अस्तित्वात नसतो.
एकाकीपण वेगळं , एकांत वेगळा . परीसराचं मौन म्हणजे एकांत .आणि परिवारात असतानाही पोरकं वाटण हे एकाकीपण .एकाकी वाटलं तर मनसोक्त रडावं.
अश्रु म्हणजे दुबळेपणा नाही. पावसाळी ढग जसे बरसल्यावर हलके होतात. आणि दिसेनासे होतात, तसा माणुसही हलका होतो. आकाशाजवळ पोहोचतो. असंच कोणतं तरी दुःख पार केल्यावर तुकाराम " तुका आकाशायेवढा " असं लिहुन गेला असेल.
आकाशात जेव्हा ऊपग्रह सोडतात तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर पिटाळुन लावे पर्यंत संघर्ष असतो, त्याने गती घेतली की उरलेला प्रवास आपोआपच होतो . असच माणसाचं आहे.......समाजात एक विशिष्ट ऊंची गाठे प्रर्यंत सगळा संघर्ष असतो. पण एकदा अपेक्षित ऊंचीवर पोहोचलात की आयुष्यातल्या अनेक समस्या ती ऊंचीच सोड्वते.
सर्वात जिवघेणा क्षण कोणता? खूप सद्भावनेनं एखादी गोष्ट करायला जावं आणि स्वतःचा काहीही अपराध नसताना पदरी फक्त वाईटपणा यावा, सद-हेतूंचीच शंका घेतली जावी, हा!
पावसातून भटकताना अंगावरचा शर्ट भिजतो , तेंव्हा काही वाटत नाही. तो अंगावरच हळू हळू सुकतो त्याचंही काही वाटत नाही.सुकला नाही तरी ओल्याची सवय होते.पण म्हणून कोणी ओलाच शर्ट घाल म्हटले तर.....
प्रश्नांपासून नेहमीच पळता येत नाही,कधी ना कधी ते पळणार्याला गाठतातच,पळवाटा मुक्कामाला पोहचवत नाहीत, मुक्कामाला पोहचवतात ते सरळ रस्तेच...
निर्णय चुकीचा आहे की बरोबर हे काळावर मोजायचं की बुध्दीवर ?बुध्दीच नसेल तर ३ तास दिले तरी पेपर कसा सोडवणार ?
महोत्सव
आयुष्य निव्वळ जगण्यासाठी नसतं. आयुष्याचा महोत्सव करायचा असतो.
निर्जीव वस्तूंबद्दल तुम्ही हमदर्दी दाखवायला सुरुवात केलीत तर त्यातूनच जित्याजागत्या माणसाचा आदर करणं हा सहजधर्म होईल.
एका क्षणात दृष्टीकोन बदलणं हे साधंसुधं स्थित्यंतर नाही. जगातली सर्वात अवघड गोष्ट म्हणजे विचार बदलणं. इतर गोष्टी केव्हाही बदलता येतात. आज आवडलेली गोष्ट उद्या फेकून देता येते. पण नवा विचार स्वीकारणं ही खूप मोठी घटना आहे. आणि तो क्षण साजरा केलाच पाहिजे.
एका माणसाच्या समस्येवर दुसर्या माणसाजवळ उत्तरच नसतं. कारण सल्ला देणारा त्या समस्येपर्यंत पोचू शकत नाही. तो स्व:तच्या वैचारिक पातळीप्रमाणे त्या समस्येकडे पाहतो. समस्येतून जाणार्या माणसाच्या भूमिकेत तो जाऊ शकत नाही.
सगळ्या आयुष्याचा अर्थ घालवणारा, अंतर्मनातल्या वीणेचे तुकडे करणारा हा एकमेव शब्द. ’जास्त’. दँट्स आँल! जास्त पैसा, जास्त प्रतिष्टा, जास्त मोठं घर, जास्त वरचं पद, प्रेम आणि जास्त सेक्सही! धर्म कोणताही असो, मागणी एकच, जास्त!
व्यवसायासाठी पार्टनरशिप करता येते. पण घर गाठल्यावर कोणत्याही व्यक्तीला प्रथम घरंच हवं असतं. भूक, शरीरधर्म सगळं रुटीन असतं. पण जिव्हाळ्याचा स्पर्श झाला की - गंमत म्हणून शब्द वापरतो - रुटीनचं प्रोटीन होतं.
बुध्द सांगतो, संकटात असताना आधार शोधू नका. विघ्न किंवा संकट म्हणजे आयुष्य जगण्यासाठी एक अवसर दिला आहे असं समजा. प्रावासात जर एखादा मोठा दगड वाटे आला तर तिथं थांबू नका. त्या दगडावर उभे रहा आणि स्व:तची उंची वाढवा. आगीतून जायलाच हवं. त्याशिवाय कचरा जळून जात नाही.
यू नेव्हर मीट द सेम मँन अगेन.
जीवंतपणी मरण अनुभवायचं असेल तर माणसाने प्रेम करावं. कारण प्रेमात आणि मरणात ’स्व’ उरत नाही.
सुरक्षेची जेवढी मागणी वाढवत न्याल, तेवढं असुरक्षित वाटत राहतं. मुळातच आयुष्य असुरक्षित असतं, हे मान्य करावं. रक्षण कुणापासून करणार? कोण करणार? रक्षक ठेवून कुणाचे प्राण वाचले आहेत? म्हणूनच अस्तित्वाच्या हातात सगळं द्यायचं आणि मस्तीत जगायचं. आपण ठरवलं होतं त्यापैकी बालपणापासून काय काय घडवू शकलो? मागून किती आणि न मागता किती मिळालं, हे फ़क्त तू तुझ्यापुरतं आठवं.
समस्या नावाची वस्तूच अस्तित्वात नसते. एक विशिष्ट परिस्थिती निर्माण होते आणि तारतम्याने वागायचे असते.त्याचप्रमाणे एक माणूस दूसर्या माणसाच्या संदर्भात एका ठराविक मर्यादे पर्यंतच विचार करू शकतो किंवा मदत करू शकतो.म्हणून एवढ्यासाठीच कुणालाही बदलण्याच्या खटाटोपात माणसानेपडू नये. असह्य झालं तर अलिप्त व्हावं, उपदेशक होउ नये.दुसर्याचे प्रश्न सोडवताना तुम्ही त्याची बुध्दी वापरून त्या समस्येकडे बघू शकत नाही.तुम्ही तुमचाच तराजू वापरता.
कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, पण गगनभरारीचं वेड रक्तातच असावं लागतं ... कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही. आकाशात जेव्हा ऊपग्रह सोडतात तेव्हा गुरुत्वाकर्शणाच्या बाहेर पिटाळुन लावे पर्यंत संघर्ष असतो, त्याने गती घेतली की उरलेला प्रवास आपोआपच होतो . असंच माणसाचं आहे.......समाजात एक विशिष्ट ऊंची गाठे प्रर्यंत सगळा संघर्ष असतो. पण एकदा अपेक्षित ऊंचीवर पोहोचलात की आयुष्यातल्या अनेक समस्या ती ऊंचीच सोड्वते समस्या नावाची वस्तूच अस्तित्वात नसते. एक विशिष्ट परिस्थिती निर्माण होते आणि तारतम्याने वागायचे असते.त्याचप्रमाणे एक माणूस दूसर्या माणसाच्या संदर्भात एका ठराविक मर्यादे पर्यंतच विचार करू शकतो किंवा मदत करू शकतो.म्हणून एवढ्यासाठीच कुणालाही बदलण्याच्या खटाटोपात माणसानेपडू नये. असह्य झालं तर अलिप्त व्हावं, उपदेशक होउ नये.दुसर्याचे प्रश्न सोडवताना तुम्ही त्याची बुध्दी वापरून त्या समस्येकडे बघू शकत नाही.तुम्ही तुमचाच तराजू वापरता.
" आयुष्य खुप साधे असतं. कधीकधी खुप रटाळ असतं. आयुष्याच महोत्स्व करता आला पाहेजे. स्वास घेणं आणि सोडन. ह्याला जगणं म्हणत नाहीत. प्रत्येक श्वास घेताना आसमंतातल्या सुगंधाचा प्रत्येय आला पाहीजे"'.
"बंद दरवाजांची एकजुट पटकन होते, कारण त्या दरवाज्याच्या पल्याड भ्याड माणसांची घरे असतात" .."दूसर्या व्यक्तीला स्पर्श केल्यानंतर आपल्या शरीरामध्ये जी आवर्तने निर्मान होतात त्या आवर्तनांना समोरच्या व्यक्तीची स्पंदने भेटली पाहीजेत. तस घडल्यानंतरच स्पर्शाची कविता होते"
"एका क्षणामध्ये पत्नीची आई होते, नवर्याने त्यानंतर 'पिता' व्हावं ही पत्नीची अपेक्षा असते. पण तस घडत नाही. ह्याच कारण दिवस गेल्या पासुन दिवस पुर्ण होई पर्यंत पत्नीने मातृत्वाचा छोटा कोर्स केलेला असतो. एकच विद्यार्थी असलेला वर्ग तीने नऊ महीने संभाळलेला असतो. मुल आणि आई, शाळेतच असतात. आणि पुरुष शाळा सोडून अन्यत्र असतो. म्हणुनच त्याला पिता व्हायला वेळ लागतो."
वपुर्वाई
प्रेम निर्माण व्हायला सहवासाची मदत लागते. जितका सहवास जास्त तितके प्रेम जास्त. आकर्षणाला एक सेकंदाचा सहवास पुरतो. म्हणुनच आकर्षणाला अस्तित्व काही सेकंदापुरतचं असतं.फ़ायदा नेहमी गरीब स्वभावाचा घेतला जातो.तुम्ही भिडस्त आहात ना हेच समोरचा माणुस हेरत असतो. बोडक्यावर बसुन तुम्ही पै न पै वसुल करणार्यांपैकी नव्हेत, याची खात्री पटल्यावरच तुमच्याशी व्यवहार केला जातो.अशा माणसांकडे तुमच्यापेक्षा मोठ्यांदा गळा काढण्याचं सामर्थ्य आणी तुमच्यापेक्ष्या मोठ्या अडचणींची यादी असते.
परिस्थिती बदलणारे आपण कोण? गृहीत धरायची शक्ति एवढ्यासाठीच वाढवायची, त्यामुळे 'मन' नावाची एक दुर्मिळ वस्तू सुरक्षित राहते. टवटवीत राहते. मन कोसळलं की माणूस कोसळला मन शाबूत ठेवलं की आयुष्य पैलथडीला हसतखेळत नेता येतं. माणूस प्रथम मनान खचतो. तसं झाल की प्रवाह संथ असतानाही त्यांच्या होड्या उलटतात. आपण फक्त एवढच करू शकतो की आपण आपला शब्द फिरवल्यामुळे दुसर्याची होडी बुडणार नाही ना एवढीच काळजी घ्यायची, म्हणजे घेऊ शकतो.
शरीर ही दिसणारी गोष्ट आहे. दोन व्यक्तीना एकमेकांबद्दल विचार करायला लावणारं आणि म्हणूनच जवळ असणारं ते माध्यम आहे. शरीर गौन मानण्यात काहीच अर्थ नाही. संसाराचा प्रवासच ह्या स्टेशनावरून सुरू होतो. तेव्हा हे पहीलं स्टेशन चुकवता येत नाही. तिथ रेंगाळू नये वा तिथंच मुक्काम करू नये. पण चुकवता कसं येईल? सौंदर्याचा वेध नेहमीच दृश्यापासून अदृश्याकडे जाणारा असतो. प्रत्येक जण आपापल्या कुवतीनुसार अधलं मधलं स्टेशन निवडतो. सगळेच संसार बघून सावरूनही सुखाचे होत नाहीत ह्याच कारण ते आहे पहीलं स्टेशनच ते सोडायला तयार नसतात. रंगमंचावरचा संसार आणि प्रत्यक्षातला संसार ह्यात हाच फरक आहे. रंगमंचावरचा संसार आणि प्रवास फक्त शरीराचा संसार. तिथ सौंदर्य आणि शरीर संपला की प्रवास संपला.
माझी संसाराची व्याख्याच निराळी आहे.एकमेकांचे वाभाडे काढण्यासाठी किंवा वर्मावर चोची मारण्यासाठी संसार करायचा नसतो.जिथं जोडीदार कमी पडेल तिथं आपण उभं राहायच. मी तुला स्वीकारलं ते तुझ्या वलायासहित स्वीकारलं. माणसाच्या स्वभावतली एखादी छटा म्हणजे तो संपूर्ण माणूस नाही. एखाद्या क्षणी एखादी भावना अनावर होते. का? ह्याचं कारण ज्याचं त्याच्याजवळ नसतं.भावनांचे तिढे आपण बुद्धीने सोडवायला बघतो आणि बुद्धिवादानं कठोर प्रश्न सोडवायचे असतात. तिथं आपण भावनेचा घोळ घालतो ही सगळी झापडच.
'निर्णय चुकीचा आहे की योग्य आहे हे काळा वर मोजायच की बुद्धीवर? तुम्हाला बुद्धीच नसेल तर पेपर सोडवायला संपूर्ण तीन तास नव्हे, अख्खा दिवस दिला तरी काय उपयोग? आपण सगळ्या गोष्टी वापरायला शिकतो, फक्त वेळ वापरायला शिकत नाही. किल्लीच घड्याळ गेल Electronic च आल. वेगवेगळी घड्याळ वापरायची की संपल..'
V.P. Kale's Blog
- V.P. Kale's profile
- 410 followers

