D.M. Mirasdar
Born
India
Genre
“खरोखर असे जातिवंत वेड असावे लागते नाही? जगातला पहिला व्याकरणकार पाणिनी. संस्कृत भाषेचे पहिले व्याकरण सिद्ध करणारा तो पहिला वैश्याकरणी, भाषेतला प्रत्येक शब्द कसा तयार झाला याचा तो विचार करीत असे. त्याची अशी गोष्ट सांगतात की ‘व्याघ्र’ हा संस्कृतमधील शब्द कसा आला, त्याची व्युत्पत्ती काय हे त्याला नीटसे उमगत नव्हते. अरण्यामध्ये तो असाच चिंतन करीत बसला असताना एक वाघ अचानक त्याच्या अंगावर धावून आला! आला तो गर्जना करीत, डरकाळी फोडीतच. त्याने पाणिनीच्या अंगावर झेप घेतली. पण तशाही स्थितीत पाणिनीने आनंदाने टाळी वाजवली. एकदम तो ओरडला, ‘‘हां. आत्ता कळलं! ‘प्रा जीघ्रती इति व्याघ्र:’ (जो गर्जना करतो तो वाघ!...)’’ हे म्हणत असताना वाघाने त्याच्या अंगावर झेप घेतली आणि त्याला ठार मारले!... निदान कथा तशी आहे.”
― अंगत पंगत / ANGAT PANGAT
― अंगत पंगत / ANGAT PANGAT
Is this you? Let us know. If not, help out and invite D.M. to Goodreads.






















