सोनवणींनी ११ वर्षांचे असताना "फितुरी" हे नाटक लिहिले. वयाच्या १६ व्या वर्षी त्यांनी लिहिलेली पहिली बालकादंबरी (नरभक्षकांच्या बेटावर) मेहता पब्लिशिंग हाउसने प्रकाशित केली. राज्य शासनाच्या अनुदानाने त्यांचा पहिला कवितासंग्रह "प्रवासी" प्रसिद्ध झाला. सव्यसाची, मृत्युरेखा, रक्त हिटलरचे, बीजिंगच्या वाटेवर, क्लिओपात्रा इ. त्यांच्या कादंबऱ्या इंग्रजीत अनुवादित झाल्या. कल्की, शून्य महाभारत, कुशाण, ओडीसी आणि यशोवर्मन या त्यांच्या तत्त्वचिंतनात्मक कादंबऱ्यां आहेत. कुशाणचा अनुवाद इंग्रजीत "Last of the wanderers" या नावाने आणि यशोवर्मनचा "The Jungle" या नावाने प्रसिद्ध झाला. त्यांची राणी शीबाला केंद्रीभूत धरून लिहीलेली "The Awakening" ही इंग्रजी कादंबरी प्रसिद्ध आहे. या कादंबरीचा मराठी अनुवादही आहे. त्यांच्या "पर्जन्य सूक्त" या काव्याचा इंग्रजीत अनुवादसोनवणींनी ११ वर्षांचे असताना "फितुरी" हे नाटक लिहिले. वयाच्या १६ व्या वर्षी त्यांनी लिहिलेली पहिली बालकादंबरी (नरभक्षकांच्या बेटावर) मेहता पब्लिशिंग हाउसने प्रकाशित केली. राज्य शासनाच्या अनुदानाने त्यांचा पहिला कवितासंग्रह "प्रवासी" प्रसिद्ध झाला. सव्यसाची, मृत्युरेखा, रक्त हिटलरचे, बीजिंगच्या वाटेवर, क्लिओपात्रा इ. त्यांच्या कादंबऱ्या इंग्रजीत अनुवादित झाल्या. कल्की, शून्य महाभारत, कुशाण, ओडीसी आणि यशोवर्मन या त्यांच्या तत्त्वचिंतनात्मक कादंबऱ्यां आहेत. कुशाणचा अनुवाद इंग्रजीत "Last of the wanderers" या नावाने आणि यशोवर्मनचा "The Jungle" या नावाने प्रसिद्ध झाला. त्यांची राणी शीबाला केंद्रीभूत धरून लिहीलेली "The Awakening" ही इंग्रजी कादंबरी प्रसिद्ध आहे. या कादंबरीचा मराठी अनुवादही आहे. त्यांच्या "पर्जन्य सूक्त" या काव्याचा इंग्रजीत अनुवाद झाला आणि त्यातील निवडक ८ कवितांना संगीतबद्ध करून त्याची ध्वनीफीतही प्रसिद्ध झाली. त्यांची "असुरवेद" ही अलीकडेच प्रसिद्ध झालेली सांस्कृतिक थरारकथा आहे. त्यांची "...आणि पानिपत" ही कादंबरी सर्वधिक गाजली. ही मराठीतील पहिली subaltern कादंबरी आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून लिहिलेला त्यांचा नीतिशास्त्र हा नैतिक समस्यांबद्दलचा चिंतनपर ग्रंथ प्रसिद्ध आहे. त्यांनी अनेक नाटकेही लिहिली. त्यातील काहींचे प्रयोगही झाले. त्यांनी विश्वनिर्मितीबाबतचा स्वतंत्र सिद्धान्त "अवकाशताण सिद्धान्त आणि विश्वनिर्मिती" नामक स्वप्रकाशित पुस्तकात मांडला आहे. आधुनिक दुर्बिणींनी केलेल्या निरीक्षणांमधूनही या सिद्धांताला पाठींबा मिळालेला नाही. कोणत्याही मानांकित खगोल-जर्नल, प्रकाशनांमधे संशोधक आणि अभ्यासकांनी या सिद्धांताची दखल घेतल्याचं दिसत नाही. त्यांनी धर्मेतिहासावर "हिंदू धर्माचे शैव रहस्य" आणि "विठ्ठलाचा नवा शोध" हे ग्रंथ सिद्ध केले. अलीकडेच त्यांचा "महार कोण होते?" हा महार समाजाचा पुरातन इतिहास उलगडून दाखवणारा महत्त्वाचा ग्रंथ प्रकाशित झाला आहे....more