आठवणी १: पहिल्या पाच गोष्टी
नमस्कार! आजच्या ब्लॉग मध्ये आठवणी १ ते ५ बद्दल अधिक सांगते. आयुष्यात सर्व आठवणी दु:खामयी नसतात तर जास्त करून आनंदमयी असतात हा मनस्विनीचा अनुभव थेट आपल्या सारखाच आहे. या प्रवासात मिळणारे मनाचे हेलकावे अलौकिक वाटतात. लहानपण कितीही दु:ख आणि कष्टांनी माखलेलं असलं तरी आपण जस जसे मोठे होतो तसतसे त्यांतील सुखद भाग निवडून आपण त्याची सुंदर माळ बनवतो. बालपणाच्या memories अधिकाधिक refine होतात आणि अधिक जिवलग होतात.
प्रायमरी शाळेतील शिपाई (प्यून) सुद्धा आपल्या मनात घर करून बसतो. त्याच्या चिडवण्याला उत्तर न देऊ शकलेली मनस्विनी त्याला पट्टीने मारण्यास धावते. त्यात तिचा बालीशपणा आहे जो आजही अतिशय गोडव्याने तिच्या लिखाणात प्रस्तुत झालेला दिसतो. समाजातील स्त्री-पुरुष भेद तिला नेहमीच खटकतो. वीणा विराणी असो किंवा वीरेंद्र शहा असो, समाजरचनेच्या दोषाने त्यांना होणारा त्रास शारीरिक हानी नसून मानसिक हानी अधिक करतो. अशा वेळी खात्रीची, विश्वासाची व्यक्ती ही बहुतांशी प्रेमळ teacher असते. मुलं आणि त्यांचे पालक हे नातं जन्मसिद्ध असलं तरी जेव्हा त्यांच्या मतांत तफावत येते तेव्हा ती दूर करणारी व्यक्ती teacher च असते. या भूमिकेत मनस्विनी अनेकदा गेलेली दिसते.
'पहिल खोटं' या आठवणीत तिच्यावर घरातून असलेले संस्कार अप्रतिम प्रकारे मनस्विनीने दाखवले आहेत. खोटं बोलणं, चोरून करणं हे वाईटच. खोटं आज नाही उद्या, मग, नंतर कधीतरी, उघडं पडतं. स्वत:च्या मनाला खातं. आपली चैन सुख नष्ट करतं. म्हणून ही गोष्ट वाचली की या संस्काराचं महत्त्व आपल्यालाही पटेल. व्यवहारिक खोटं हे ही खोटच जरी आज त्याला पुसट मान्यता समाज देतो! निष्कर्ष : या दुनियेत खरं पाहिलं तर खरं आणि खोटं काहीच नाही तर ते relative असतं आणि आपल्या आपल्या जागी योग्यच असतं.
समाजाच्या अदृष्य बंधनानं पालकांची होणारी कुचंबणा, मुलांची मानसिक हानी आणि त्यांच्या इच्छा आणि कुवतीचा ऱ्हास मनस्विनी 'किती अनैसर्गिक' या गोष्टीत व्यक्त करते. समाजानं आज या बंधनांतून बाहेर पाडायची वेळ आली आहे. मनस्विनीने सहज मांडलेले तिचे विचार आपल्या मनात दीर्घ काळ घर करतील अशी आशा करते.
Read आठवणी भाग १ on: www.smashwords.com/books/view/546386Manaswini's Facebook: www.facebook.com/pages/मनस्विनी/693942534067869
Manaswini's quote of the day: Truth is relative.

Published on June 03, 2015 03:05
No comments have been added yet.