Type of Tenses

विद्यार्थ्यांना काळाचे ज्ञान असणे फारच आवश्यक आहे. काळ हा इंग्रजी व्याकरण आणि भाषा यांचा आत्मा आहे. काळाशिवाय Grammar येत नाही. काळाशिवाय वाक्यरचना येत नाही. वाक्यारचनेशिवाय इंग्रजी नसते. सध्याच्या Computer आणि Internet च्या युगात इंग्रजी शिवाय आधुनिक जग नाही. त्यासाठी काळाचा अभ्यास फारच आवश्यक आहे. काळांच्या विविध प्रकारची माहिती या पाठात दिलेली आहे. त्यांच्या व्याख्या मराठी आणि इंग्रजीत सोप्या करून दिलेल्या आहेत.

Tense (काळ)

Tense means time.
काळ म्हणजेच वेळ.

काळ हा क्रियेवर अवलंबून असतो, तर क्रिया ही क्रियापदावर अवलंबून असते.

काळाचे तीन मुख्य प्रकार आहेत.
1. Present Tense (वर्तमान काळ)
2. Past Tense (भूतकाळ)
3. Future Tense (भविष्यकाळ)

Present Tense (वर्तमान काळ)
The tense in which action of the verb occurs is called as present tense.
ज्या काळात क्रिया घडत असते अशा काळास वर्तमानकाळ असे म्हणतात.

Past Tense (भूतकाळ)
The tense in which action of the verb occurred is called as past tense.
ज्या काळात क्रिया घडून गेलेली असते अशा काळास भूतकाळ असे म्हणतात.

Future Tense (भविष्यकाळ)
The tense in which action of the verb will occur is called as future tense.
ज्या काळात क्रिया घडणार असते अशा काळास भविष्यकाळ असे म्हणतात.


Purushottam Muley
1 like ·   •  0 comments  •  flag
Share on Twitter
Published on November 30, 2015 00:35 Tags: billingual, english-grammar-through-marathi, tesne
No comments have been added yet.