Find & Share Quotes with Friends
श्यामची आई Quotes
श्यामची आई
by
Sane Guruji3,313 ratings, 4.42 average rating, 137 reviews
श्यामची आई Quotes
Showing 1-4 of 4
“लग्न करून पुरुष कोमलता शिकतो, हृदयाचे गुण शिकतो. स्त्री बुद्धीचे गुण शिकते. विवाह म्हणजे हृदय व बुद्धी, भावना व विचार यांचे मधुर मिश्रण, मधुर सहकार्य होय. पुरुषांच्या हृदयात स्त्रीगुण येणे व स्त्रीजवळ पुरुषगुण येणे म्हणजे विवाह होय.”
― श्यामची आई (Shyamchi Aai)
― श्यामची आई (Shyamchi Aai)
“रवींद्रनाथ टागोरांनी म्हटले आहे : ‘‘तुला एकटेच जावे लागेल. जा, तू आपला कंदील घेऊन जा. लोकांच्या टीकेचा झंजावात सुटेल व तुझ्या हातातील दिवा विझेल. परंतु तो पुन्हा लाव व पुढे पाऊल टाक. तुला एकट्यानेच जावे लागेल.”
― श्यामची आई
― श्यामची आई
“मोठेपणा याचा अर्थ जगाला माहीत असणे, असा मी करीत नाही. मी निर्दोष होत आहे, हळूहळू उन्नत होत आहे, ही ज्याला जाणीव आहे, तो मोठाच होत आहे. मोठा होत जाण्याची ही प्रवृत्ती व्यक्तीच्या ठिकाणी आईबापच उत्पन्न करितात.”
― श्यामची आई (Shyamchi Aai)
― श्यामची आई (Shyamchi Aai)
“ते फोफावेल, फळेल. ‘‘एकदा काय झाले, ती अवसेची रात्र होती. भाऊ वडवलीस गेले होते. सकाळी आठ वाजता ते त्या गावी जाऊन पोचले होते. आज गावाला जाऊ नका, आज अवस आहे, वगैरे घरातील मंडळींनी त्यांना सांगितले; परंतु भाऊ म्हणाले, ‘‘कसली अवस नि कसला शनिवार! जे व्हावयाचे ते होणार. प्रत्येक दिवस”
― श्यामची आई
― श्यामची आई
