मन में है विश्वास [Man Me Hai Vishwaas] Quotes

Rate this book
Clear rating
मन में है विश्वास [Man Me Hai Vishwaas] (Marathi Edition) मन में है विश्वास [Man Me Hai Vishwaas] by Vishwas Nangre Patil
1,441 ratings, 4.20 average rating, 99 reviews
मन में है विश्वास [Man Me Hai Vishwaas] Quotes Showing 1-5 of 5
“झाकली मूठ सव्वा लाखाची’ ठेवायची नाही. भिडायचं, लढायचं. जिंकलो तर उत्तम, हरलो तर भिडल्याचा आनंद व लढाईचा अनुभव तर कुठे जाणार नाही.”
Vishwas NangrePatil, Mann Mein Hain Vishwas
“आकाशातून एखादा थेंब थेट हातावर पडला, तर तो पाय धुवायलाही वापरता येत नाही. तो तापलेल्या पत्र्यावर पडला, तर क्षणार्धात नष्ट होतो. जर तो कमळपुष्पावर पडला, तर तो मोत्यासारखा चमकतो आणि जर तो शिंपल्यात पडला, तर त्या पाण्याच्या थेंबाचाच मौल्यवान मोती होतो. तो थेंब सारखाच असतो. पण त्याचं अस्तित्व, लायकी व किंमत तो कोणाच्या संपर्कात येतो, यावर अवलंबून असतं.”
Vishwas Nangare Patil, Mann Mein Hain Vishwas
“दुसऱ्यातला चांगुलपणा स्वीकारला नाही, की ती असूया बनते आणि दुसऱ्यातल्या चांगल्या गुणांची कदर केली, तर ती प्रेरणा बनते. कोणत्याही व्यक्तीला जर आपण कोणत्याही अटीशिवाय स्वीकारलं, तर ते प्रेम बनतं आणि जर अटी, शर्ती घातल्या, की त्या व्यक्तीबाबत द्वेष तयार होतो. ज्या गोष्टी आपल्या हातात नाही, त्या गोष्टींबद्दल त्रागा केला; तर संताप निर्माण होतो व त्याच गोष्टी बदलू शकतो की बदलू शकत नाही, हे शहाणपण आलं, की सहिष्णुता तयार होते.”
Vishwas Nangare Patil, Mann Mein Hain Vishwas
“भूक लागली, की जेवायचो व झोप आली, की झोपायचो. त्यासाठी वेळ व जागा निश्चित नव्हती. सगळं कसं नैसर्गिकपणे चालायचं. आता मात्र पोरांची प्लेटसुद्धा गरम पाण्यात उकळून घ्यावी लागते. हॉटेलमध्ये गेलो, तर मिनरल वॉटरच पिण्यासाठी लागतं. पोरांना फळं खा, म्हणून आर्जवं करावी लागतात. आणि दर दहा मिनिटाला त्यांना ‘सॅनिटायझरनं हात स्वच्छ कर’ म्हणून ओरडावं लागतं. मला आठवतच नाही, की मला ताप आला होता किंवा दवाखान्यात ॲडमिट करावं लागलं होतं. सर्दी-खोकला कधी यायचा व सुंठेविना निघून जायचा, हे शर्टच्या खारवटलेल्या बाह्या वगळता कुणाला कळायचंदेखील नाही. आजकाल मात्र मुलांना शिंक आली, तरी पेडियाट्रीक डॉक्टरकडे धाव घेऊन त्यांच्यावर औषधांचा अतिरेकी भडीमार आम्ही करतो. काय आहे हा विरोधाभास? आम्ही बदललो की वातावरण? पर्यावरण प्रदूषित झालं की आमची मनं? देवाला माहीत!”
Vishwas NangrePatil, Mann Mein Hain Vishwas
“भीती म्हणजे काय, तर भविष्याची चिंता! अस्थिरता न स्वीकारणं. एकदा ती स्वीकारली, की आयुष्य एखाद्या साहसी खेळासारख बनतं. कोणाचाही तिरस्कार करायचा नाही. असूया बाळगायवी नाही. दुसऱ्यातला चांगुलपणा स्वीकारला नाही, की ती असूया बनते आणि दुसऱ्यातल्या चांगल्या गुणांची कदर केली, तर ती प्रेरणा बनते. कोणत्याही व्यक्तीला जर आपण कोणत्याही अटीशिवाय स्वीकारलं, तर ते प्रेम बनतं आणि जर अटी, शर्ती घातल्या, की त्या व्यक्तीबाबत द्वेष तयार होतो. ज्या गोष्टी आपल्या हातात नाही, त्या गोष्टींबद्दल त्रागा केला; तर संताप निर्माण होतो व त्याच गोष्टी बदलू शकतो की बदलू शकत नाही, हे शहाणपण आलं, की सहिष्णुता तयार होते.” काकांचे”
Vishwas NangrePatil, Mann Mein Hain Vishwas