Goodreads helps you follow your favorite authors. Be the first to learn about new releases!
Start by following Milind Bokil.
Showing 1-6 of 6
“नंतर एकदा संध्याकाळच्या दोन ऑफ तासांना आमची आणि नववी 'ड'ची मॅच झाली तेव्हा फावड्यानं पाच विकेट्स काढल्या तर चित्र्यानं लागोपाठ तीन फोर मारल्या, तेव्हा ती सरळ त्यांच्याकडे आली.
"काँग्रॅच्युलेशन्स, पवार." ती म्हणाली. "काय सोलिड विकेट्स काढल्यास तू. चित्रे तूसुद्धा मस्त खेळलास."
चित्र्याला काय फरक पडला नाही. कारण त्याला बांद्र्याच्या पोरींची सवय होती. त्यानं नुसता केसावरून हात फिरवला आणि दिलं; पण फावड्याची मात्र विकेट गेली.
"काय म्हणाली रे ती?" त्यानं मला नंतर विचारलं. "काँग्रेसचं अधिवेशन? त्याचा काय संबंध?"
त्यावर आम्ही चिक्कार हसलो. तेव्हापासून कुणाचं अभिनंदन करायचं असलं तर आम्ही तेच म्हणू लगलो. काँग्रेसचं अधिवेशन.”
― शाळा [Shala]

“मी काय करावं न कळून नुसता बसून राहिलो. आम्ही एकमेकांकडे मधून मधून बघत होतो आणि ती बहिणीशी बोलण्यात गुंग आहे असं दाखवत असली तरी तिचं लक्ष माझ्याकडे होतं हे मला माहित होतं. पण वेळ फुकट जात होता. एवढं सगळं जमवून आणून काही बोलणंच नाही म्हणजे काय? परत अशी संधी कधी येणार? मला आतल्या आत खूप अस्वस्थ व्हायला होत होतं.
मग बराच वेळ असा गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ते असं बसणंसुद्धा खूप छान होतं. त्या बाहेरच्या मंडपालाही स्वच्छ, गार काळी फरशी होती. फुलांचा आणि उदबत्त्यांचा सुंदर वास दरवळत होता. मधून मधून घंटा वाजत होत्या. सगळे लोक कसे स्वच्छ आंघोळी करून चांगले चांगले कपडे घालून आले होते. सगळं वातावरण कसं आनंदी आणि पवित्र होतं आणि मुख्य म्हणजे त्या मंडपात शिरोडकर होती. माझ्यापासून लांब बसलेली. पण तिच्या आणि माझ्यामध्ये काही तरी होतं. सोनेरी आकाशगंगेसारखं. आणि ते जे होतं त्यानं आम्हांला दोघांना बांधून घेतलं होतं. आणि ते इतर कुणालाच दिसत नव्हतं. तिच्या बहिणीला, आजूबाजूच्या माणसांना, कुणालाच नाही. फक्त आम्हांलाच दिसत होतं ते आणि तिथल्या त्या देवांना. ते आमच्याकडे पाहून गालातल्या गालात हसत असणार आणि न मागताही आशीर्वाद देत असणार. आणि ते काही तरी होतं हे मला उशिरानं कळलं, पण शिरोडकरला आधीच कळलं असणार. म्हणून ती शांतपणे बसली होती. नुसती मंद मंद हसत.
मग मला कळलं की, आम्ही जे शोधतोय ते हे आहे. ते जे आमच्या दोघांमध्ये न बोलता भरून राहिलं होतं ते. आम्ही सगळेच शोधत होतो ते. मी, सुऱ्या, फावड्या, चित्र्या, आंबेकर, सुकडी, नरूमामा. आम्हांला सगळ्यांना पाहिजे होतं ते हेच. त्याला काय म्हणतात ते मला माहित नव्हतं. पण त्याची काही गरज नव्हती. ते मला सापडलं होतं आणि तिलाही. मग पूर्वी कधीही पहिला नव्हता असला आनंद माझ्या मनात भरून आला. मला खूप सुंदर वाटलं. पवित्र. भाग्यवान.
म्हणून मग थोड्या वेळानं त्या दोघी उठल्या आणि फाटकाकडे चालू लागल्या तेव्हा मी शांतपणे त्यांना जाऊ दिलं. ती फाटकातून जाताना मागे वळून पाहील हे मला माहित होतं. तसं तिनं पाहिलंच. तिला लांबून दिसलं नसणार, पण मी समजूतदारपणे फक्त हसलो.”

“मिरीकरनं माझ्या सांगण्याप्रमाणं केलं तेव्हा मी तिला उंट खाऊ दिला. मग एक प्यादंसुद्धा भेट दिलं. मला आता सॉलिड मजा वाटत होती. माझं मन समोरच्या डावावर नव्हतं. मी एक जगज्जेता सम्राट होतो. पण उदार आणि दयाळू. शरण आलेल्याला मारून टाकणं हा माझा धर्म नव्हता. "जा, तुझा राज्य तुला परत दिलं." माझ्यासमोर वाकलेल्या त्या राजाला मी हात झटकत बेफिकीरपणे म्हणालो. असल्या राज्याची मला पर्वा नव्हती. माझी ती विश्वविजयी सेना घेऊन मी राजधानीत मोठ्या डौलानं परतणार होतो. तिथं कुणी तरी माझी वाट बघत होतं. डोळ्यांत दिवे लावून, तबकात निरांजनं पेटवून.”
― शाळा [Shala]
― शाळा [Shala]
“बाबांना अर्थातच टीव्हीमध्ये इंटरेस्ट नव्हता. पण आता त्यांना खेळायला भिडू मिळेनासे झाले. सुखटणकरकाका एकदा आले. डाव चांगला रंगात आला होता. पण तेवढ्यात ते 'दिनूच्या सासूबाई' लागलं. तसे काका टुणकन डावावरून उठले.
"जोशीबुवा, माफ करा." ते म्हणाले. "पाहिजे तर आमची हार धरा; पण हे चुकवायचं जमणार नाही."
बाबा मग काय करणार? त्यांनी निमूटपणे पट आवरला.
"आता बुद्धिबळ संपलं!" ते मला म्हणाले.”

“The irony was we would pray for a free period during school hours to escape classes, but a whole vacation with no school was turning out to a burden.”
― Shala
― Shala
“सामाजिक आणि राजकीय चर्चेत ‘गांधी अधिक आंबेडकर’ असा विचार मांडण्याऐवजी ‘गांधी विरुद्ध आंबेडकर’ असा विचार मांडला जातो. तसा तो केल्याने विचारांमध्ये वाढ तर होत नाहीच, शिवाय अकारण दुरावा किंवा शत्रुत्व निर्माण होते. पाचगावच्या ग्रामस्थांनी यातून”
― कहाणी पाचगावची | Kahani Pachgavchi
― कहाणी पाचगावची | Kahani Pachgavchi

![समुद्र [Samudra] समुद्र [Samudra]](https://i.gr-assets.com/images/S/compressed.photo.goodreads.com/books/1412661712l/16179119._SX98_.jpg)
![झेन गार्डन [Zen Garden] झेन गार्डन [Zen Garden]](https://i.gr-assets.com/images/S/compressed.photo.goodreads.com/books/1354627595l/12839961._SX98_.jpg)
![गवत्या [Gavatya] गवत्या [Gavatya]](https://i.gr-assets.com/images/S/compressed.photo.goodreads.com/books/1507275868l/36362483._SX98_.jpg)
![एकम् [Ekam] एकम् [Ekam]](https://i.gr-assets.com/images/S/compressed.photo.goodreads.com/books/1428057577l/15779170._SX98_.jpg)