तुझी पापणी

सहजच उठते तुझी पापणी
सहजच झुकते खाली अलगद
आणि आमही इथे बिचारे
एका नजरेमधये गारद !

पापणीत या फडफडणारी
खुळया जीवांची फुलपाखरे
वयात येती सूरयकिरण ते
तुझया पापणीत थरथरती जे !

तुझी पापणी दिवसरातरीचया
मैफिलीतला पंचम गहिरा
लवलवता ती या हृदयाची
सतार होते दिडदा दिडदा

तुझया पापणीतून अडकली
'हो-नाही' ची अनवट कोडी
मिटून उघडे कषणारधात तया
आमुचयासाठी युगे थबकती !

तुझी पापणी हळवी, अललद
तरी आमहाला भलता धाक
तुझी पापणी चुकवून देतो
नकळे कितीदा तुलाच हाक

सहजच आता उघड पापणी
सहजच सुटू दे आमचे पराण
काय एकदा निकाल लागो
दिगंत होवो अंतरधान !...
 •  0 comments  •  flag
Share on Twitter
Published on January 02, 2013 05:33
No comments have been added yet.


Sandeep Khare's Blog

Sandeep Khare
Sandeep Khare isn't a Goodreads Author (yet), but they do have a blog, so here are some recent posts imported from their feed.
Follow Sandeep Khare's blog with rss.