एका दशकापूर्वी मी कर्नाटकातील प्रसिद्ध साहित्यिक आणि भारतीय समाज, साहित्य आणि संस्कृतीचे अभ्यासक/संशोधक रहमत तरीकेरी यांचे अमीरबाई कर्नाटकी या गायिकेच्या चरित्राचे कन्नडमधून मराठी अनुवादाचे काम केले, जे ग्रंथाली प्रकाशन, मुंबई यांनी २०१४ मध्ये प्रकाशित केले. त्याच वेळेला त्यांची इतरही पुस्तके मी मराठीत आणण्याचा मानस केला होता. त्यांचे कर्नाटकातील सुफीपंथ, नाथपंथ या विषयावरील पुस्तके प्रसिद्ध आहेत, […]
Published on May 22, 2025 03:13