(?)
Quotes are added by the Goodreads community and are not verified by Goodreads. (Learn more)
P.L. Deshpande

“शेवटी संस्कृती म्हणजे बाजरीची भाकरी... वांग्याचे भरीत...गणपतीबाप्पा मोरया ची मुक्त आरोळी. केळीच्या पानातली भाताची मूद आणि त्यावरचे वरण. उघड्या पायांनी तुडवलेला पंचगंगेचा काठ...मारूतीच्या देवळात एका दमात फोडलेल्या नारळातले उडालेले पाणी...दुस-याचा पाय चूकुन लागल्यावर देखील आपण प्रथम केलेला नमस्कार...दिव्या दिव्यादिपत्कार...आजीने सांगितलेल्या भुतांच्या गोष्टी... मारुतीची न जळणारी आणि वाटेल तेव्हा लहानमोठी होणारी शेपटी...दस-याला वाटायची आपट्याची पाने...पंढरपुरचे धुळ आणि अबिर यांच्या समप्रमाणात मिसळून खाल्लेले डाळे आणि साखरफुटाणे...सिंहगडावर भरुन आलेली छाती आणि दिवंगत आप्त्यांच्या मुठभर अस्थींचा गंगार्पणाच्या वेळी झालेला स्पर्श...कुंभाराच्या चाकावर फिरणा-या गोळ्याला त्याचे पाण्याने भिजलेले नाजुक हात लागून घाटादार मडके घडावे तसा ह्या अद्रूश्य पण भावनेने भिजलेल्या हांतानी हा पिंड घडत असतो.कुणाला देशी मडक्याचा आकार येतो.कुणाला विदेशी कपबशीचा...”

P.L. Deshpande
tags: culture, life
Read more quotes from P.L. Deshpande


Share this quote:
Share on Twitter

Friends Who Liked This Quote

To see what your friends thought of this quote, please sign up!

50 likes
All Members Who Liked This Quote




Browse By Tag