Goodreads helps you follow your favorite authors. Be the first to learn about new releases!
Start by following P.L. Deshpande.
Showing 1-7 of 7
“आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठीआवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.
- पु. ल.”
―
- पु. ल.”
―
“कुणीसं म्हटलयं - कसा मी ? कसा मी ? कसा मी ? कसा मी ? जसा मी तसा मी असा मी असामी!... खर सांगू का? हे कुणीसं वगैरे म्हटलेलं नाही. मीच म्हटलयं. पण कुणीसं म्हटलयं अस म्हटल्याशिवाय तुम्हीही कान टवकारून काय म्हटलयं ते ऐक्लं नसत. हे असच आहे. जगात काय म्हटलयं यापेक्षा कुणी म्हटलयं यालाच अधिक महत्व आहे हे मला कळून चुकलंय.”
―
―
“जुन्यात आपण रंगतो... स्मृतीची पाने उलटायला बोटांना डोळ्यातलं पाणी लागते. मग त्या स्मृती सुखाच्या असोत वा दु:खाच्या!”
― अपूर्वाई [Apurvai]
― अपूर्वाई [Apurvai]
“शेवटी संस्कृती म्हणजे बाजरीची भाकरी... वांग्याचे भरीत...गणपतीबाप्पा मोरया ची मुक्त आरोळी. केळीच्या पानातली भाताची मूद आणि त्यावरचे वरण. उघड्या पायांनी तुडवलेला पंचगंगेचा काठ...मारूतीच्या देवळात एका दमात फोडलेल्या नारळातले उडालेले पाणी...दुस-याचा पाय चूकुन लागल्यावर देखील आपण प्रथम केलेला नमस्कार...दिव्या दिव्यादिपत्कार...आजीने सांगितलेल्या भुतांच्या गोष्टी... मारुतीची न जळणारी आणि वाटेल तेव्हा लहानमोठी होणारी शेपटी...दस-याला वाटायची आपट्याची पाने...पंढरपुरचे धुळ आणि अबिर यांच्या समप्रमाणात मिसळून खाल्लेले डाळे आणि साखरफुटाणे...सिंहगडावर भरुन आलेली छाती आणि दिवंगत आप्त्यांच्या मुठभर अस्थींचा गंगार्पणाच्या वेळी झालेला स्पर्श...कुंभाराच्या चाकावर फिरणा-या गोळ्याला त्याचे पाण्याने भिजलेले नाजुक हात लागून घाटादार मडके घडावे तसा ह्या अद्रूश्य पण भावनेने भिजलेल्या हांतानी हा पिंड घडत असतो.कुणाला देशी मडक्याचा आकार येतो.कुणाला विदेशी कपबशीचा...”
―
―
“प्रोब्लेम्स नसतात कोणाला? ते शेवटपर्यंत असतात. पण प्रत्येक प्रोब्लेमला उत्तर असतंच.
ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा तर कधी माणसं. या तिन्ही गोष्टीपलीकडला प्रोब्लेम अस्तित्वातच नसतो.”
―
ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा तर कधी माणसं. या तिन्ही गोष्टीपलीकडला प्रोब्लेम अस्तित्वातच नसतो.”
―
“रातराणीचा सुगंध पलंगावर लोळता लोळता उपभोगू शकतो. पण तुळस वृंदावनातच राहते. तिच्यापुढे आपल्यालाच उभं राहावं लागतं.”
―
―

![असा मी असामी [Asa Mi Asami] असा मी असामी [Asa Mi Asami]](https://i.gr-assets.com/images/S/compressed.photo.goodreads.com/books/1322728784l/12374843._SX98_.jpg)
![अपूर्वाई [Apurvai] अपूर्वाई [Apurvai]](https://i.gr-assets.com/images/S/compressed.photo.goodreads.com/books/1322723813l/12372258._SX98_.jpg)
![पूर्वरंग [Purvarang] पूर्वरंग [Purvarang]](https://i.gr-assets.com/images/S/compressed.photo.goodreads.com/books/1322730615l/12372284._SX98_.jpg)
![जावे त्यांच्या देशा [Jave Tyanchya Desha] जावे त्यांच्या देशा [Jave Tyanchya Desha]](https://i.gr-assets.com/images/S/compressed.photo.goodreads.com/books/1350139583l/12374884._SX98_.jpg)