गणगोत [Ganagot] Quotes

Rate this book
Clear rating
गणगोत [Ganagot] गणगोत [Ganagot] by P.L. Deshpande
673 ratings, 4.21 average rating, 15 reviews
गणगोत [Ganagot] Quotes Showing 1-1 of 1
“एखाद्या माणसाची आणि आपली वेव्हलेंथ का जमावी आणि एखाद्याची का जमू नये त्याला काही उत्तर नाही.

पंधरा-पंधरा वीस-वीस वर्षांच्या परिचयाची माणसे असतात पण शिष्टाचाराची घडी थोडीशी मोडण्यापलीकडे त्यांचा आपला संबंध जातच नाही. त्यांच्या घरी जाणे होते भेटणे बोलणे होते पण भेटी झाल्या तरी मनाच्या गाठी पडत नाहीत आणि काही माणसे एक क्षणभरात जन्मजन्मांचे नाते असल्यासारखी दुवा साधून जातात. वागण्यातला बेतशुद्धपणा क्षणात नष्ट होतो.

तिथे स्थलभिन्नत्व आड येत नाही. पूर्वसंस्कार, भाषा, चवी, आवडीनिवडी कशाचाही आधार लागत नाही.

सूत जमून जाते.
गाठी पक्क्या बसतात.”
P.L. Deshpande, गणगोत [Ganagot]