Leena > Leena's Quotes

Showing 1-3 of 3
sort by

  • #1
    P.L. Deshpande
    “शेवटी संस्कृती म्हणजे बाजरीची भाकरी... वांग्याचे भरीत...गणपतीबाप्पा मोरया ची मुक्त आरोळी. केळीच्या पानातली भाताची मूद आणि त्यावरचे वरण. उघड्या पायांनी तुडवलेला पंचगंगेचा काठ...मारूतीच्या देवळात एका दमात फोडलेल्या नारळातले उडालेले पाणी...दुस-याचा पाय चूकुन लागल्यावर देखील आपण प्रथम केलेला नमस्कार...दिव्या दिव्यादिपत्कार...आजीने सांगितलेल्या भुतांच्या गोष्टी... मारुतीची न जळणारी आणि वाटेल तेव्हा लहानमोठी होणारी शेपटी...दस-याला वाटायची आपट्याची पाने...पंढरपुरचे धुळ आणि अबिर यांच्या समप्रमाणात मिसळून खाल्लेले डाळे आणि साखरफुटाणे...सिंहगडावर भरुन आलेली छाती आणि दिवंगत आप्त्यांच्या मुठभर अस्थींचा गंगार्पणाच्या वेळी झालेला स्पर्श...कुंभाराच्या चाकावर फिरणा-या गोळ्याला त्याचे पाण्याने भिजलेले नाजुक हात लागून घाटादार मडके घडावे तसा ह्या अद्रूश्य पण भावनेने भिजलेल्या हांतानी हा पिंड घडत असतो.कुणाला देशी मडक्याचा आकार येतो.कुणाला विदेशी कपबशीचा...”
    P.L. Deshpande

  • #2
    P.L. Deshpande
    “जुन्यात आपण रंगतो... स्मृतीची पाने उलटायला बोटांना डोळ्यातलं पाणी लागते. मग त्या स्मृती सुखाच्या असोत वा दु:खाच्या!”
    P.L. Deshpande, अपूर्वाई [Apurvai]

  • #3
    P.L. Deshpande
    “आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठीआवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.
    - पु. ल.”
    Purushottam Laxman Deshpande



Rss
All Quotes



Tags From Leena’s Quotes