अनिकेत महाजनी > अनिकेत's Quotes

Showing 1-11 of 11
sort by

  • #1
    Gajanan Digambar Madgulkar
    “झाला आणि गेला.’ झाल्याबरोबर जाणारा मुलगा, मग झाला तरी कशालाॽ त्या आत्म्याला एक कुडी नासून टाकण्याचा काय हक्कॽ कशाला मिळाला होता त्या मुलाला जन्मॽ”
    Gajanan Digambar Madgulkar, Sone Aani Mati: Short Stories By Gadima

  • #2
    रणजित देसाई
    “सागर केवढा अफाट! कदाचित तो खोल असेलही! पण त्या सागराला उंची कुठे आहे? ज्याची मान ताठ नाही, त्याने जगावं कशाला? त्या सपाट जिण्याला अर्थ तरी काय?”
    रणजित देसाई, मोरपंखी सावल्या [Morpankhi Savlya]

  • #3
    रणजित देसाई
    “नदीचा अहंकार सरला होता. वाऱ्याबरोबर सळसळणारे हिरवे काठ पाहत ती शांत होत होती. तिच्या गुलाबी नजरेला निळे गहिरेपण लाभत होते. मनाच्या खोल डोहात मात्र असंख्य मासोळ्या सळसळत होत्या.”
    रणजित देसाई, मोरपंखी सावल्या [Morpankhi Savlya]

  • #4
    “शान्ति अकर्मण्यता का दूसरा नाम है, और अकर्मण्यता ही मुक्ति है। जिसे सारा विश्व अकर्मण्यता कहता है, वह वास्तव में अकर्मण्यता नहीं है; क्योंकि उस स्थिति में मस्तिष्क कार्य किया करता है। अकर्मण्यता के अर्थ होते हैं–जिस शून्य से उत्पन्न हुए हैं, उसी में लय हो जाना। और वही शून्य जीवन का निर्धारित लक्ष्य है।”
    Bhagwaticharan Verma, चित्रलेखा

  • #5
    Ruskin Bond
    “I suppose Hinduism comes closest to being a nature religion. Rivers, rocks, trees, plants, animals and birds, all play their part, both in mythology and in everyday worship. This harmony is most evident in these remote places, where gods and mountains co-exist.”
    Ruskin Bond, Roads to Mussoorie

  • #6
    Durga Bhagwat
    “जे जे म्हणून वसंताचे आहे त्याला त्याला पूर्णत्व व अखेरीस विराम देण्याचेही काम वैशाखाचेच आहे. चैत्राचा हा सखा त्याचे कार्य पूर्ण करतो; परंतु सौंदर्याची जी विकलावस्था चैत्र सहन करू शकता ना, तीही हा ज्येष्ठाशी सहमत करून, सृष्टीच्या तालाचा नूर सांभाळण्यासाठी, उघड्या डोळ्यांनी घडवून आणतो.”
    Durga Bhagwat, ऋतुचक्र [Rutuchakra]

  • #7
    Durga Bhagwat
    “सर्व ॠतूंचे सार या महिन्यात येते. वसंताचे पुष्पवैभव, ज्येष्ठाचे फलवैभव, श्रावणातला हिरवेपणा, आश्विनातली वातावरणाची खुलावट आणि धान्यलक्ष्मीच्या मंगलमय पावलांची चाहूल, हेमंतातल्या गार वार्‍याच्या झुळका, शिशिरातली थंडीची लहर, सारे काही माफक प्रमाणात या महिन्यात अनुभवायला मिळते.”
    Durga Bhagwat, ऋतुचक्र [Rutuchakra]

  • #8
    “मोठेपणा याचा अर्थ जगाला माहीत असणे, असा मी करीत नाही. मी निर्दोष होत आहे, हळूहळू उन्नत होत आहे, ही ज्याला जाणीव आहे, तो मोठाच होत आहे. मोठा होत जाण्याची ही प्रवृत्ती व्यक्तीच्या ठिकाणी आईबापच उत्पन्न करितात.”
    Sane Guruji, श्यामची आई (Shyamchi Aai)

  • #9
    “लग्न करून पुरुष कोमलता शिकतो, हृदयाचे गुण शिकतो. स्त्री बुद्धीचे गुण शिकते. विवाह म्हणजे हृदय व बुद्धी, भावना व विचार यांचे मधुर मिश्रण, मधुर सहकार्य होय. पुरुषांच्या हृदयात स्त्रीगुण येणे व स्त्रीजवळ पुरुषगुण येणे म्हणजे विवाह होय.”
    Sane Guruji, श्यामची आई (Shyamchi Aai)

  • #10
    Vishnu Sakharam Khandekar
    “पुरुष क्षणात फकीर होऊ शकतो. पण स्त्री ही सुखासुखी जोगीण होत नाही.”
    Vishnu Sakharam Khandekar, क्रौंचवध

  • #11
    Vishnu Sakharam Khandekar
    “सौंदर्याइतकी सत्याची उपासना सोपी नाही.”
    Vishnu Sakharam Khandekar, क्रौंचवध



Rss