"लोक वेगवेगळ्या कारणांनी ग्रंथ वाचतात. मी मात्र जगण्यासाठीच वाचत होतो. ग्रंथांनीच माझा तोल सावरला, त्यांनीच दाखवल्या वाटा, त्यांनीच दिल्या विचारांच्या दिशा आणि त्यांच्यामुळेच बळावल्या जगण्याच्या आशा... मी कोणी शब्दप्रभू नाही. लेखक तर नाहीच नाही. उसवणं आणि शिवणं या दोन प्रक्रियांमध्ये जे काही गवसलं ते इथं मांडतो आहे. मी वाचली तेवढीच पुस्तकं अंतिम आहेत असंही नाही...
— Jul 23, 2023 08:42PM
Add a comment