Sandeep Khare's Blog

July 22, 2013

निरोप

कवी संदीप खरे यांचा गेसटरूम सदरातला शेवटचा लेख (
)
दुसरीतला एक मुलगा खूप असवसथ आहे. पोटात सारखा गोळा येतोय तयाचया...
डोळे आतून गरम झालेत. आजोळी आलाय काही दिवसांसाठी...
आणि आता थोडयाच वेळात पुनहा घरी जायचंय...
- दिवस खूप खेळलाय, मजा केलीय, लाड झालेत.
पण खरं सांगायचं तर आलया दिवसापासून तयाला भीती वाटतेय ती याच कषणाची..
आजीचया कुशीत झोपताना, आजोबांची गोषट ऐकताना, दंगा मांडताना,
सतत तयाचया मनात हा नकोनकोसा कषण कधीचाच ठाण मांडून राहिलाय...
कितीही दुरलकष करून खेळात रमायचा परतयन केला तरी गाणयामागे तानपुऱयाचा...
 •  0 comments  •  flag
Share on Twitter
Published on July 22, 2013 04:55

July 19, 2013

रात्र रात्र सोशी रक्त...

खूप जागलो. इंजिनिअरिची सबमिशनस, कधी कारयकरमांचे दौरे, नाटकाचया रिहरसलस, 'बालगंधरव'जवळ पुलावरचया गपपा, सायकलवरची भटकंती, कधी उगाचच एकटयानेच वडाचया पारावर दिलेला डेरा! एकदा तर शेवटची लोणावळा लोकल गाठून आमही - मितरांनी मुददामून विनातिकिट परवास करून लोणावळा गाठलं. (ते थरिल कायदेशीररितया इनकमटॅकस बुडवणयात नककीच नाही!) टिसीनी पकडलं... तयाचया केबिनमधये तयाचयाशी जिवाभावाचया गपपा मारलयावर एक तासानी सोडलं. मग रातर लोणावळयाचया बससटॅनडवर घालवून, पहाटेची पुणे लोकल गाठली, ती लोणावळयापासून रेलवे रुळावरून चा...
 •  0 comments  •  flag
Share on Twitter
Published on July 19, 2013 00:11

July 17, 2013

सिनेमाला न जाणे...

एकदा काय झालं...
एक होता ' तो ' ... एक होती ' ती ' ... आणि एक होता सिनेमा!
तिघांनी एकदा भेटायचं ठरवलं...
एकमेकांना पहायचं ठरवलं; ठरवलं; पण घडलं मात्र नाही...
कशाला तरी घाबरून, कशावर तरी रागावून ती आलीच नाही...
मग त्याने एकट्यानेच थिएटरसमोरच्या बाकड्यावर ठाण मांडलं...
ती येणार नाही माहित असून वाट पाहिली... ती आली नाहीच!
कधीच!
कुणी नव्हतंच बोलायला... मग त्याने त्याच्या हक्काचा कागद जवळ ओढला... कशासाठी कुणास ठाऊक; पण लिहू लागला...
--------

यु हॅव्ह टु बिलीव्ह...
प्रिय सहप्रवाश्या,
सिनेमाला न जाणे ही सुद्धा...
 •  0 comments  •  flag
Share on Twitter
Published on July 17, 2013 06:15

July 15, 2013

ती

ती रुसलेलया ओठांइतकी निशचयी
डोळयांमधलया बाहुलीपरी चंचल
गालावरलया खळीसारखी लाडी
भाळावरलया बटेसारखी अवखळ.....

ती रंगांनी गजबजलेली पशचिमा
ती रातरीचा पुनव पिसारा चंदरमा
मेघांमधले अपार ओले देणे
ती मातीचया गंधामधले गाणे......

ती यकषाचया परशनाहूनही अवघड
ती छोटयाशया परीकथेहून सोपी
कळीत लपलया फुलासारखी असफुट
दवबिंदुंचया शवासांइतकी अललद....

ती गोऱया देहावर हिरवे गोंदण
ती रोमांचांचया रानफुलांची पखरण
पावसातली पहाट हळवी ओली
ती सांजेचया पायांमधले पैंजण.....

ती अशी का ती तशी सांगू कसे ?
भिरभिरती वाऱयावर शबदांची पिसे !
ती कवि...
 •  0 comments  •  flag
Share on Twitter
Published on July 15, 2013 07:52

June 15, 2013

थू तिच्यायला....

नाव…गाव…घर…

मी रमलोय खरा… पण हे माझं गाव नवहे…
आणि मी सांगत फिरतो ना… ते माझं नाव नवहे…
बदलायचंच आहे हे सारं…

माझया नावाचया बॉकसमधये कसं पडत नाही एखादंही पतर ?
का फकत मीच लिहायचंय जीव तोडून… घुसमट सोसत ?
गाव गाठायचंय जिथे पतता नसूनही माझया दारात पडतील बोलकी पतर…
आणि नावाचं काय…
सापडेलच चांगलंसं… फलॉवरपॉटमधये खोचलेलं
जोवर आतून फुलत नाही एखादी बाग
तोवर एवढयावरच भागवू !

हा कुलुपाआतला चौकोन
महणजे माझं घर नवहे काही,
मी आपला असतो इथे दिवसरातर;
अषटौपरहर भोगून काढतो
खाणं, झोपणं, टी. वही., गाणं…

……थू तिचयायला !

पावसाळ...
 •  0 comments  •  flag
Share on Twitter
Published on June 15, 2013 01:48

June 13, 2013

तेवढे तरी राहू दे

मी काय तुला मागावे, अन काय तू मला द्यावे
छे सखी निराशा कसली मागणीच नव्हती कसली

ती हीच हीच ती जागा अन ती हीच हीच ती वेळा
मी ग्रीष्म उभा जळणारा डोळ्यात तुझ्या घन गोळा
जा भिजवून सारी माती मृद्गंध मला राहू दे
तेवढे तरी राहू दे…

ती सर्व स्वागते वाया प्राक्तनात नव्हती माया
मी स्पर्शही केला नाही तरी कशी आक्रसे काया
जा उत्तर घेऊन याचे अन प्रश्न मला राहू दे
तेवढे तरी राहू दे…

तू चंद्रच होतीस अवघी मज म्हणून भरती
आली वाळूत काढली नावे लाटांत वाहून गेली
जा घेऊन जा ही भरती ती लाट मला राहू दे
तेवढे तरी राहू दे…

-संदीप खर...
 •  0 comments  •  flag
Share on Twitter
Published on June 13, 2013 08:01

January 12, 2013

शिवण

तशी आपली सगळी गाणी आपली समजत असतोच आपण
एखादेचसे गाणे तयातले आतली शिवण उसवत जाते...
असले गाणे बऱयाचदा रडता रडता ओठी येते
साधारणत: असलया वेळी आपले कोणी जवळ नसते...

आपले असे असतेच कोण ? एकदोन मिठया आणि चारदोन थेंब ?
असले गाणे असलया वेळी असलेच काही सांगत असते...

रसतयावरून वाहणाऱयांचया नजरा जेवढया ओळखी देतात
पुतळयांचया समोर किंवा काही जसे उभे असतात...
तसेच बघणे बघत बघत गरदी होते आरपार
एकलेपणाचया जाणिवेला आणखीन थोडी चढते धार...

तसे दुकटे असतेच कोण ? सगळेच असतात आपले आपले
'आपले आपले' महटले तरी आपण कुठे असतो आप...
 •  0 comments  •  flag
Share on Twitter
Published on January 12, 2013 21:55

January 2, 2013

तुझी पापणी

सहजच उठते तुझी पापणी
सहजच झुकते खाली अलगद
आणि आमही इथे बिचारे
एका नजरेमधये गारद !

पापणीत या फडफडणारी
खुळया जीवांची फुलपाखरे
वयात येती सूरयकिरण ते
तुझया पापणीत थरथरती जे !

तुझी पापणी दिवसरातरीचया
मैफिलीतला पंचम गहिरा
लवलवता ती या हृदयाची
सतार होते दिडदा दिडदा

तुझया पापणीतून अडकली
'हो-नाही' ची अनवट कोडी
मिटून उघडे कषणारधात तया
आमुचयासाठी युगे थबकती !

तुझी पापणी हळवी, अललद
तरी आमहाला भलता धाक
तुझी पापणी चुकवून देतो
नकळे कितीदा तुलाच हाक

सहजच आता उघड पापणी
सहजच सुटू दे आमचे पराण
काय एकदा निकाल लागो
दिगंत होवो अंतरधान !...
 •  0 comments  •  flag
Share on Twitter
Published on January 02, 2013 05:33

December 22, 2012

पाऊस

गोष्ट सुरु होईल तेव्हा सुरु झाला पाहिजे.....
गोष्ट वाचून होईस्तोवर पडला पाहिजे....
गोष्टीतल्या पात्रांमध्ये रमला पाहिजे...
नायिकेमागे धावताना दमला पाहिजे...
दोघांमधल्या रागासारखा
लटका लटका भांडला पाहिजे...
नंतर तिच्या डोळ्यांमधून
सर सर सांडला पाहिजे...

सुखदु:खाच्या होडीतून असे दूरवर तरंगताना...
मध्येच भान यावे आणि पहावे तर पाऊस !
'हा कधी आला?' म्हणावे हसून...
मागे रेलून...डोळे मिटून....
मग आठवावी आपली एखादी गोष्ट-
- तर तिथेही...पाऊस !...

-संदीप खरे
 •  0 comments  •  flag
Share on Twitter
Published on December 22, 2012 22:26

December 19, 2012

पौगंड

मग मी त्यादिवशी भलताSSच विचार केला
'हे भलतेच !' असं म्हणालीच आई !
आभाळभरून सांडले होते प्रश्नच प्रश्न
आणि ढगभरसुद्धा उत्तर मिळाले नाही !!...

पाण्याबरोबर वाहत आलो होतो मीही
पण ते कळलेच नव्हते आत्तापर्यंत
पंधरा-सोळा वर्षांची एकसंध बेशुद्धी;
आणि जागतो तो पाणी पोहोचलेच गळ्यापर्यंत !

पहाटे एकदा अचानक घुमू लागली बासरी
ऐकलेच नव्हते असे आत्तापर्यंत काही...
आणि अर्धवट झोपेतच...आठवले उगाचच...
बरेच दिवसांत आजोबांनी कुशीत घेतले नाही....

आठवले; पण तसे वाटले नाही काहीच
देहभर फडफडत होती एक नवीन कोरी वही
...'वर्गातली टप्प...
 •  0 comments  •  flag
Share on Twitter
Published on December 19, 2012 06:22

Sandeep Khare's Blog

Sandeep Khare
Sandeep Khare isn't a Goodreads Author (yet), but they do have a blog, so here are some recent posts imported from their feed.
Follow Sandeep Khare's blog with rss.