Varun Deshpande

Add friend
Sign in to Goodreads to learn more about Varun.

https://www.goodreads.com/varunraje

जगाला पोखरणारी डा...
Rate this book
Clear rating

progress: 
 
  (page 135 of 302)
Mar 05, 2024 04:08AM

 
Book cover for Palestine-Israel ( पॅलेस्टाईन-इस्रायल )
ज्यू लोकांचं स्वतंत्र राष्ट्र निर्माण करण्याच्या संकल्पनेला ‘झियोनिझम’ असं म्हणतात; तर या प्रवृत्तीला ‘झियोनिस्ट’ प्रवृत्ती असं म्हणतात.
Loading...
“पूर्वीच्या काळी काही पाश्‍चिमात्य इतिहासकारांनी आपल्या सोयीसाठी या विभागाच्या पूर्व दिशेकडच्या प्रदेशाचे तीन भाग पाडले. त्यामधला पहिला ‘नियर ईस्ट’ हा भाग युरोपला सगळ्यात जवळ असलेल्या मध्यसमुद्रापासून पर्शियातल्या प्रदेशाचा होता. दुसरा ‘मिडल ईस्ट’ हा भाग वाळवंटी प्रदेश ते आग्नेय आशिया इथपर्यंतचा होता. तिसरा ‘फार ईस्ट’ हा भाग पॅसिफिक समुद्राकडे तोंड असलेल्या प्रदेशांचा होता. 1880”
Atul Kahate, Palestine-Israel

“1950 च्या दशकात इजिप्तमध्ये धार्मिक तत्त्वांवर आधारित असलेली मूल्यं स्वीकारून अतिउजव्या विचासरणीच्या कट्टर लोकांनी ‘मुस्लीम ब्रदरहूड’ या संघटनेची स्थापना केली. हाज अमिननं आता या संघटनेशी आपली नाळ जोडली.”
Atul Kahate, Palestine-Israel

“1920 सालच्या ‘सॅन रेमो कॉन्फरन्स’मधल्या निर्णयानुसार ब्रिटिशांना पॅलेस्टाईनचं भवितव्य ठरवण्यासाठीचे अधिकार देण्यात आले. तसंच पॅलेस्टाईनमध्ये ब्रिटिश लष्कराच्या सत्तेऐवजी ब्रिटिश सरकारचे प्रतिनिधी कामकाज पाहतील असा निर्णय घेण्यात आला. यानंतर दोन वर्षांनी आंतररष्ट्रीय पातळीवरचे प्रश्‍न सोडवण्यासाठी ‘लीग ऑफ नेशन्स’ या नव्या संघटनेची स्थापना झाली. या संघटनेनं पॅलेस्टाईनच्या संदर्भातल्या आधीच्या निर्णयाला मान्यता तर दिलीच; पण त्याशिवाय बॅल्फोर करारालाही पाठिंबा दिला. कहर म्हणजे पॅलेस्टाईनच्या भूमीवरची अधिकृत भाषा हिब्रू असेल असं सांगून या संघटनेनं अरब लोकांना मोठा धक्का दिला आणि झियोनिस्ट आकांक्षांना मोठंच खतपाणी घातलं.”
Atul Kahate, Palestine-Israel

“झियोनिस्ट विचारसरणी पुढे नेण्यामध्ये महत्त्वाची भूमिका 1882 सालच्या लिओ पिन्स्कर याच्या (Autoemancipation) या पुस्तकानं बजावली. युरोपमध्ये ज्यू लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी ते अपयशीच ठरतील अशी पिन्स्करची धारणा होती.”
Atul Kahate, Palestine-Israel

“पहिल्या महायुद्धाच्या अखेरच्या काळात पॅरिसमध्ये झालेल्या शांतता परिषदेमध्ये एक करार झाला होता. त्यानुसार पॅलेस्टाईनच्या भूमीच्या संदर्भातले सगळे निर्णय घेत असताना सीरिया, जॉर्डन, इराक आणि पॅलेस्टाईन या देशांची मान्यता घेण्यात येईल असं ठरलं. यासाठी ‘किंग-क्रेन कमिशन’ या नावानं ओळखली जाणारी एक समिती मध्यपूर्व आशियामध्ये धाडण्यात आली. या समितीनं नंतर दिलेल्या अहवालात अगदी स्पष्टपणे मध्यपूर्व आशियाच्या भागामधून स्थानिक अरब लोकांना हुसकावून लावून त्या ठिकाणी ज्यू लोकांचा देश उभा करणं साफ चूक असल्याचं मत व्यक्त करण्यात आलं. तसंच”
Atul Kahate, Palestine-Israel

year in books
Himansh...
3 books | 67 friends

Raghven...
8 books | 48 friends

Sonali ...
15 books | 8 friends

Prashan...
1 book | 117 friends

Atul Gujar
1 book | 25 friends

Neeta P...
1 book | 9 friends

Parag T...
2 books | 76 friends

Sujal Raul
1 book | 74 friends

More friends…


Polls voted on by Varun

Lists liked by Varun